Watermelon Rate Hike : वाढता पारा, ‘रमजान’मुळे कलिंगडला वाढती मागणी

Watermelon Rate Hike
Watermelon Rate Hikeesakal

धुळे : वाढत्या उन्हाची तीव्रता व रमजान महिन्यातील उपवास यामुळे कलिंगडाला मागणी वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी कलिंगड विक्रीची दुकाने पाहायला मिळत आहेत.

दहा ते वीस रुपये किलो दराने कलिंगड विक्री (Watermelon Rate) होत आहे. त्यातही शुगरक्वीन जातीच्या कलिंगडाला सर्वाधिक मागणी आहे. (demand for watermelon increased due to intense heat and fasting during month of Ramadan dhule news)

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगडाच्या सेवनाला प्राधान्य दिले जाते. यंदाही जसजशी उन्हाची तीव्रता वाढत आहे, तशी कलिंगडालाही मागणी वाढत आहे. शिवाय रमजान महिना सुरू झाल्याने मुस्लिम बांधवांकडूनही इतर विविध फळांबरोबरच कलिंगडाचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.

सध्या बाजारात वीस ते तीस रुपये किलो दराने कलिंगड उपलब्ध आहेत. गडद हिरव्या रंगाचे कलिंगड ‘शुगरकिंग’ या नावाने ओळखले जाते. नावाप्रमाणे त्याची चवही साखरेसारखी असते. तर फिक्कट हिरवे पट्टे असणारे लांबट व आकाराने मोठे कलिंगड ‘नामधारी’ या नावाने ओळखले जाते. सेंद्रिय खताच्या वापरातून घेतलेल्या कलिंगडांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Watermelon Rate Hike
NMC News : नाशिक महापालिका आरोग्यसेवेच्या टोल फ्री क्रमांकासाठी राज्यात दुसरी!

किरकोळ बाजारात १५ ते ५० रुपयांपर्यंत कलिंगड मिळत आहे. बाजारात जिल्ह्यातील विविध भागांतून कलिंगडाची आवक सुरू आहे. जिल्ह्यातील काही शेतकरीही कलिंगडाचे उत्पादन घेतात. अशा शेतकऱ्यांकडूनही कलिंगड विक्री सुरू आहे. उन्हाचा तीव्रता वाढेल तशी कलिंगडला मागणी वाढणार आहे.

Watermelon Rate Hike
Abhay Yojana : कारवाई होईल तेव्हा बघू...! मालमत्ता कर थकबाकीदारांची मानसिकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com