जलसंपदामंत्र्यांनी, ‘आमचे ‘कमळ’ कोठे?’ म्हणताच हास्याचे फवारे

जलसंपदामंत्र्यांनी, ‘आमचे ‘कमळ’ कोठे?’ म्हणताच हास्याचे फवारे

जळगाव - युवाशक्ती फाउंडेशनच्या पतंगोत्सवात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली. पतंगोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता निवडणूक विभागाने ‘व्हीव्हीपॅट’ मशिनची प्रात्यक्षिके दाखविण्याची संधी सोडली नाही. कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीश महाजन आल्यानंतर त्यांना ‘व्हीव्हीपॅट’ मशिनद्वारे आपण कोणाला मतदान केले आहे, याची माहिती सात सेकंद एका स्क्रीनवर दिसते. यामुळे मतदारांना आपण केलेले मतदान आपल्या उमेदवारालाच गेले का, याची माहिती दिसते.

मंत्री महाजन यांनाही तहसीलदार अमोल निकम व सहकाऱ्यांनी ‘व्हीव्हीपॅट’ मशिनची माहिती दिली. मंत्र्यांना मतदान करण्यास विनंती केली. मतदान यंत्रावर ‘डमी’ मतपत्रिका असल्याने विविध नावे व चिन्हे मतदान पत्रिकेवर होती. मंत्री महाजन यांनी ‘कमळा’वर मतदान करण्यास बोट उचलले. मात्र, मतपत्रिकेवर ‘कमळ’ चिन्ह दिसले नाही. यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना, ‘काहो आमचे ‘कमळ’ चिन्ह कोठे दिसत नाही.’ यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर लगेच अधिकाऱ्यांनी ही डमी मतपत्रिका असल्याने राजकीय पक्षांची चिन्हे लावण्यात आली नाहीत. नंतर मंत्री महाजन यांनी मतदान केले. सात सेकंद मतदान केलेले चिन्हच दिसले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com