Nandurbar News : विकासकामांसाठी 24 कोटी मंजूर; नवीन वसाहतींमध्ये होणार सुविधा उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Basic facilities will be available to citizens due to road and sewerage works in new settlements.

Nandurbar News : विकासकामांसाठी 24 कोटी मंजूर; नवीन वसाहतींमध्ये होणार सुविधा उपलब्ध

तळोदा (जि. नंदुरबार) : तळोदा पालिकेच्या नवीन हद्दवाढ प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून, हद्दवाढ झालेल्या क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवीन वसाहतींमध्ये रस्ते, गटारी, पथदीप आदींच्या कामांसाठी नगरविकास विभागाकडून २४ कोटी ४४ लाखांच्या विकास निधीला (Funding) मंजुरी देण्यात आली. (development fund of 24 crore approved by Urban Development Department for development works nandurbar news)

यामुळे शहरातील नवीन वसाहतींमधील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, या प्रकल्प खर्चाच्या ९० टक्के खर्च राज्य शासनाचा, तर १० टक्के खर्च तळोदा पालिकेच्या असणार आहे.

तळोदा शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, नवीन वसाहती मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शहराप्रमाणेच अनेक नवीन वसाहतींमध्येदेखील मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली आहे. शहरातील काही नवीन वसाहतींमधील विविध विकासकामांसाठी २४ कोटींच्या प्रस्तावाला नगरविकास विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

त्यात सरस्वती तुकारामनगर व मीराकाशीनगरात अंतर्गत रस्ते व गटारी तयार करण्यासाठी चार कोटी ८६ लाख ३९ हजार ८२४ रुपये, सुशीला श्रीरामनगरात अंतर्गत रस्ते व गटार तयार करण्यासाठी दोन कोटी १८ लाख ५५ हजार ४३० रुपये, गरीब नवाज कॉलनी, काशीरामनगर व रविहंसनगरात अंतर्गत रस्ते व गटारी तयार करण्यासाठी चार कोटी ४६ लाख १४ हजार ६५४ रुपये, रामकृष्णनगरात अंतर्गत रस्ते व गटारी तयार करण्यासाठी एक कोटी २५ लाख एक हजार ४२२ रुपये.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

विठ्ठलवाडी आणि पुंडलिकनगरात अंतर्गत रस्ते व गटारे तयार करण्यासाठी १३ लाख आठ हजार ७४७ रुपये, पार्वतीपुरमनगरात अंतर्गत रस्ते व गटारी तयार करण्यासाठी चार कोटी २८ लाख ४७ हजार ६९२ रुपयांचा समावेश आहे.

मीरानगरात अंतर्गत रस्ते व गटारी तयार करण्यासाठी एक कोटी ४३ लाख ६२ हजार ३६४ रुपये, लालजीनगरात तर्गत रस्ते व गटारी तयार करण्यासाठी चार कोटी ७४ लाख २५ हजार सहा रुपये, कृष्ण शोभा विहार आणि वेडूगोविंदनगर तसेच रूपानगरात अंतर्गत रस्ते व गटारी तयार करण्यासाठी एक कोटी ७२ लाख ४६ हजार ९६ रुपये, भारती दत्तात्रयनगरात अंतर्गत रस्ते व गटारी तयार करण्यासाठी एक कोटी ४३ लाख ९४ हजार ४३१ रुपये,

इंद्रप्रस्थनगर आणि श्रीरामनगर आणि चाणक्यपुरीनगरात अंतर्गत रस्ते व गटारी तयार करण्यासाठी दोन कोटी १९ लाख ३१ हजार २७३ रुपये असा एकूण २४ कोटी ४४ लाख ४४ हजार ४४४ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, प्रकल्प खर्चाच्या ९० टक्के खर्च राज्य शासन करणार आहे, तर १० टक्के खर्च तळोदा पालिका करणार आहे. यामुळे शहरातील नवीन वसाहतींमधील विविध विकासकामांचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :NandurbartalodaFunding