नांदगाव : श्री क्षेत्र नस्तनपूरचा झपट्याने विकास होईल - जयकुमार रावल

संजीव निकम
शनिवार, 17 मार्च 2018

नांदगाव : दळवळणाच्या साधनांमुळे पर्यटनासोबतच विकासाच्या नकाशावर श्री क्षेत्र नस्तनपूरची (ता. नांदगाव) संलग्नता असणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या तीर्थक्षेत्राला मोठे महत्व प्राप्त होईल असा विश्वास पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. या तीर्थस्थळाला पर्यटन विभागाकडून ब दर्जा मिळावा या देवस्थानच्या विश्वस्थांनी केलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन मंत्री रावल यांनी दिले. आज शनी अमावास्ये निमित्त श्री क्षेत्र येथील शनी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.

सकाळपासून सांयकाळी उशिरापर्यंत लाखो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह त्यांचे वडील ख्यातनाम उद्योजक सरकारसाहेब रावल, मातोश्री दोंडाईचाच्या नगराध्यक्षा सौ नयनकुंवर रावल यांच्यासह रावळ कुटुंबियातील सदस्यांनी आज शनी अमावास्येनिमित्त श्री क्षेत्र नस्तनपूरच्या शनिमंदिरात शनी मूर्तीची मंत्रोच्चारात महाअभिषेक व विधिवत यथासांग पूजा केली.

शनिभक्त असलेल्या उद्योजक सरकारसाहेब रावळ यांनी नस्तनपूरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार अवघे रावल कुटुंबीय या निमित्ताने नस्तनपूरला आले. देवस्थानच्या वतीने उदय पवार विजय चोपडा डॉक्टर शरद आहेर यांनी रावल कुटुंबियांचे स्वागत केले. देवस्थान कार्यालयात करण्यात आलेल्या स्वागत प्रसंगी बोलतांना मंत्री रावल यांनी पर्यटन क्षेत्र विकासासाठी पूरक मानले जात असल्याने या विभागाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.

सध्या जळगावमार्गे चाळीसगाव या कनेक्टिव्हिटीसाठी राज्यमार्गाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्याने व या रस्त्यावरच मध्यवर्ती  ठिकाणी असलेल्या क्षेत्र नस्तनपूरचा नजीकचा काळात झपाट्याने विकास होण्यास मदत होईल अशी ग्वाही त्यांनी देवस्थानच्या विश्वस्त व भक्तांना दिली. चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष भास्कर कदम पर्यटन विभागाचे प्रादेशिकम व्यवस्थापक नितीन मुंडावरेप्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे नारायणभाऊ अग्रवाल आदी उपस्थित होते.

आज दिवसभरात श्री क्षेत्र नस्तनपूर येथील यात्रेसाठी विविध भागातून मोठ्या प्रमाणावर लहान व्यावसायिक दाखल झाले होते तर रेल्वेने पॅसेंजर गाडयांना विशेष थांबा दिला तर एस टी महामंडळाने विशेष बसेस बसेस सोडल्या आहेत.
 
Web Title: development of nastnapur quickly