देविदास पिंगळे यांचा जामीन अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नाशिक - साक्षीदारांवर दबाव आणल्याच्या कारणावरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी खासदार देविदास पिंगळे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला.

नाशिक - साक्षीदारांवर दबाव आणल्याच्या कारणावरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी खासदार देविदास पिंगळे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला.

बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्‍क्‍याच्या 57 लाखांच्या रकमेच्या अपहारप्रकरणी पिंगळे मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांच्यातर्फे ऍड. एम. वाय. काळे यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. बी. भोस यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर आज ऍड. काळे व सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी दुपारी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सायंकाळी सातच्या सुमारास जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाबाहेर निकालाच्या प्रतीक्षेत मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

Web Title: devidas pingale bell cancel