देविदास पिंगळेंची एसीबी कडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नाशिक - नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या रकमेपैकी 57.73 लाख रुपयांच्या रकमेविषयी आज सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी खासदार देविदास पिंगळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशी केल्यावर अटक करण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक उघले यांनी जाहीर केले.

दुपारी दिडला त्यांना चौकशीला बोलाविले होते. सुमारे दोन तास चाललेल्या चौकशीनंतर श्री. पिंगळे यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळालेल्या माहितीनुसार 25 ऑक्‍टोबरला जिल्हा बॅंकेतून रोख रक्कम नेणाऱ्या लीपीक दिगंबर चिखले, लेखापाल अरविंद जैन आणि सहाय्यक विजय निकम यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे 57 लाख 73 हजार रुपये मिळाले होते. त्याबाबत पुरेशी व समाधानकारक माहिती मिळू शकली नव्हती. यामध्ये समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांचा सहभाग असावा अशी तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली होती. संबधीत पैसे 127 कर्मचाऱ्यांना मिळालेल्या पगारवाढीच्या फरकातील रक्कमेतील काही पैसे परस्पर धनादेशाद्वारे खात्यातून काढून घेतले होते. त्याचे असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. त्यामुळे या विषयाला राजकीय वळण मिळाले होते.

यासंदर्भात समितीच्या संचालक मंडळांने ठराव तिन्ही कर्मचाऱ्यांना पाठींबा व्यक्त करुन उच्च न्यायालयात दाद मागण्याचा ठराव केला होता. त्यानुसार उच्च न्यायालयाने यामध्ये अपहाराचा गुन्हा दाखल होऊ शखत नाही असे निरिक्षण नोंदविले होते. या पार्श्‍वभूमीवर आज झालेल्या चौकशीने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

Web Title: Devidas pingle inquiry from the ACB