मालगाडी घसरल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

देवळालीगाव - मालगाडी घसरल्याने मध्य रेल्वेच्या इटारसी ते मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या तब्बल पाच ते सहा तास उशिरा धावत आहेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकातून सकाळी साडेदहापासून सायंकाळी पाचपर्यंत एकही एक्‍स्प्रेस मुंबईच्या दिशेने न गेल्याने प्रवाशांचे हाल झाले.

भोपाळ (मध्य प्रदेश) रेल्वे विभागातील हरदा जिल्ह्यातील भिरंगी रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे डबे घसरल्याने इटारसी ते मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. हरदा-भिरंगी रेल्वे स्थानकातील वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी तेथील रेल्वे प्रशासनाला तब्बल पाच तास लागल्याने पहाटेपासून हरदा स्थानकात अडकलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या सकाळी अकरानंतर सुरू करण्यात आल्या. गोरखपूरहून नेहमीप्रमाणे मुंबईकडे जाणाऱ्या गोरखपूर, पनवेल, गोदान, पाटलीपुत्र व काशी या गाड्या हरदा रेल्वे स्थानकात अडकून होत्या. हळूहळू एकापाठोपाठ त्यांना मुंबईच्या दिशेने सोडण्यात आले.

Web Title: devlaligaon nashik news railway slip