जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेसाठी आंबेदिंडोरीची धनश्री रवाना

उत्तम गोसावी : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

अखिल भारतीय  बुद्धिबळ संघटनेच्या वतीने दिल्ली  येथे होणाऱ्या जागतिक  बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी  होण्याची  संधी  नाशिक  जिल्ह्यातील आंबेदिंडोरी  सारख्या  ग्रामीण  भागातील  धनश्री अनिल राठी हिला  संधी  मिळाली  आहे.

नाशिक : अखिल  भारतीय  बुद्धिबळ  संघटनेचे वतीने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मान्यता व  दिल्ली  येथे होणाऱ्या  जागतिक  बुद्धिबळ  स्पर्धेत सहभागी  होण्याची  संधी  नाशिक  जिल्ह्यातील  आंबेदिंडोरी  सारख्या  ग्रामीण  भागातील  धनश्री  अनिल  राठी  (आतरराष्ट्रीय  रेटिंग  1692) हिला  संधी  मिळाली  आहे.

धनश्री १९ वर्षांखालील मुलीच्या गटात खेळणार

धनश्री ही  बी.वाय.के महाविद्यालयात शिक्षण घेत असून मागच्या वर्षी धनश्रीने  केलेल्या राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय  कामगिरीच्या  जोरावर  तिला  सुवर्णसंधी  मिळाली आहेत. या स्पर्धेत यजमान भारत व रशिया अमेरिका  डेनमार्क  न्यूझीलंड अरमिनीया पोलंड यासह  ३८ पेक्षा  जास्त  देशाचे  निवडक  खेळाडू  सहभागी  होणार  आहेत.धनश्री  १९ वर्षाखालील  मुलीच्या  गटात आपले कौशल्य  पणाला  लावणार  आहेत  या  गटात  ९४ खेळाडू आहेत. धनश्रीचा  ८७  मानाकंन आहेत . या  गटात  १ अंतर महिला ग्रँड मास्टर,  १७ अंतर  राष्ट्रीय  महिला  मास्टर  यासह  विविध  देशातून  खेळाडू  खेळणार  आहेत.  स्पर्धेत  प्रथम  मानाकंन   चीनची  झी  जुबेर  हिला  मिळाला आहे.  यापूर्वी धनश्रीने दिल्ली येथे झालेल्या पश्चिम आशियाई  युवा बुद्धिबळ स्पर्धेत दिमाखदार कामगिरी  केली.  तिला आंबेदिंडोरी  ग्रामस्थ  जिल्हा  परिषद  आरोग्य  कर्मचारी  संघटनेचे  विजय सोपे ओझर  वैद्यकीय  अधिकारी  वैशाली  कदम,  डॉक्टर अक्षय  तारगे, प्राचार्य  कुलकर्णी, क्रीडा  शिक्षक  मोरे, विनोद  भागवत,  बोटविनीकचे  विनय  बेले, सुरज  हारगोडे  डॉक्टर योगेश धनवते आदींनी  धनश्रीला  शुभेच्छा  दिल्यात
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhanashree rathi going for World Junior Chess Championship