उमेदवारीसाठी 'राष्ट्रवादी' झालेले धनराज महाले विधानसभेसाठी पुन्हा शिवबंधनात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

लोकसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. पुढचा राजकीय मार्ग बंद झाला. त्यामुळे गेले काही दिवस अस्वस्थ असलेले महाले आज पुन्हा शिवबंधनात अडकले. 

नाशिक : लोकसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. पुढचा राजकीय मार्ग बंद झाला. त्यामुळे गेले काही दिवस अस्वस्थ असलेले महाले आज पुन्हा शिवबंधनात अडकले. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डाॅ भारती पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र ऐनवेळी घरगुती वाद आणि भाऊबंदकीमुळे त्यांची उमेदवारी कापत शिवसेनेचे महाले एका रात्रीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले होते. या घटनेमुळे भाजपला आयती संधी मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी च्या भारती पवार यांना प्रवेश व उमेदवारीही दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादात व नाराजीतून महाले यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.

भारती पवार खासदार झाल्या. तेव्हापासून खासदारकी हुकली तर विधानसभेला या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झीरवळ हे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडी घेऊन त्यांनी आपले स्थान बळकट केले होते. महाले यांची आमदारकीची वाट बंद झाल्याने महाले अस्वस्थ होते. शिवसेनेकडेही या मतदारसंघात उमेदवार नव्हता. त्यामुळे गेल्या चार दिवसात ते मातोश्रीच्या संपर्कात होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhanraj Mahale to enter Shivsena again ahead of Vindhan Sabha elections