धर्मा पाटलांचे कुटुंबीय स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

दोंडाईचा - मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखूबाई आणि मुलगा नरेंद्र पाटील यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आज सकाळी सात वाजता विखरण येथून पोलिसांनी स्थानबद्ध केले. मात्र आपणास कशासाठी रोखून धरले याबाबत पोलिसांनी माहिती दिली नसल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे.

धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. आज मुख्यमंत्री जिल्ह्यात होते. कुटुंबाने कोणतेही आंदोलन करू नये, यासाठी उपनिरीक्षक नीलेश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सकाळी सखूबाई आणि नरेंद्र यांना ताब्यात घेतले. याबाबत नरेंद्र यांनी सांगितले की, आम्हाला कोणत्या कारणाने ताब्यात घेतले याचा खुलासा करावा असा आग्रह धरला. यापुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. केंद्र आणि राज्य शासनाचे मंत्री जिल्हा दौऱ्यावर असतील मग आम्हाला कायमस्वरूपी हा त्रास सहन करावा लागेल. यापेक्षा प्रशासनाने एकदाच काय ते कोठडीत ठेवावे. म्हणजे माझ्या वृद्ध आई व कुटुंबीयांचा त्रास वाचेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. सकाळपासून सायंकाळपर्यंत नरेंद्र व त्यांच्या आई उपाशी होत्या. वास्तविक नरेंद्र पाटील यांनी पोलिस प्रशासनास आपल्याकडून कुठल्याही प्रकारची अनुचित कार्य होणार नाही, असे लेखीही दिले आहे.

Web Title: Dharma Patil Family Police Station