Dhule Crime : अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून गोळीबार; रामपुरा फाटा परिसरात 3 जखमी

Dhule Crime : तालुक्यातील कोडीद-पानसेमल रस्त्यावरील रामपुरा फाटा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना १ ऑक्टोबरला दुपारी घडली.
Dhule Crime
Dhule Crimesakal
Updated on

शिरपूर : तालुक्यातील कोडीद-पानसेमल रस्त्यावरील रामपुरा फाटा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना १ ऑक्टोबरला दुपारी घडली. त्यात तीन जण गंभीर जखमी झाले. संशयितांनी ठासणीच्या बंदुकीतून गोळीबार केला. अतिक्रमित वनजमिनीवर ताबा मिळविण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. रामपुरा फाट्यावर दोन गटांत दुपारपासून वाद सुरू होता. ( 3 injured in firing in Rampura Phata area over encroached forest land dispute )

त्यात लाठ्या, काठ्या व कुऱ्हाडींचा वापर झाल्यामुळे धरमसिंह शंकर पावरा (वय ३५) आणि राजल्या मुरल्या पावरा (वय ४२, दोघे रा. आंबाडूक, ता. शिरपूर) जखमी झाले. त्यांना १ ऑक्टोबरला सायंकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. तिसरा जखमी महेंद्रसिंह रंधे (वय ५७) बुधवारी (ता. २) सकाळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याच्या शरीरात छर्रे शिरल्याने जखमा झाल्या आहेत. प्रतिस्पर्धी गटाने ठासणीच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची माहिती त्याने दिली.

Dhule Crime
Dhule Crime : चिरणेत 4 घरांत घरफोडी; मोटारसायकल घेऊन चोरटे फरार

घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, हवालदार मोहन पाटील, रणजित वळवी, संदीप ठाकरे, पाठक, संजय चव्हाण, धनराज गोपाळ आदी घटनास्थळी दाखल झाले. संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गधडदेव, आंबाडूक व रामपुरा परिसर अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून नेहमीच धुमसत असतो. काही महिन्यांपूर्वीच पोलिस आणि वन विभागाने संयुक्त कारवाई करून मध्य प्रदेशातील टोळीचे अतिक्रमण उद्‍ध्वस्त केले होते. मात्र, अतिक्रमण करून वनजमिनीचा ताबा मिळविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. पोलिसांनी तेथे मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

Dhule Crime
Dhule Crime News : मद्यपी पतीच्या मारहाणीत पत्नी ठार; सांगवी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com