
वकवाड : शिरपूर तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. ही पिके साधारण दोन महिन्यांची झाल्याने ती आता डोलू लागली आहेत. शेतकऱ्यांकडून या पिकांच्या निंदणीसह कोळपणी, खतांची मात्रा देणे आदी कामांना वेग आला आहे. यामुळे शेतमजुरांनाही दोन महिन्यांपासून मोठा रोजगार मिळत आहे.
आदिवासी भागातील बहुतांश शेतमजूर शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात मजुरीसाठी जात असून, त्यासाठी त्यांची विविध वाहनांतून रोज धोकादायक पद्धतीने वाहतूक होत आहे. यातून अपघातांची भीती व्यक्त होत असून, पोलिस प्रशासनाचे मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. (60 laborers in one vehicle Fatal journey of tribal laborers)