Road accident
sakal
धुळे: शहरातील देवपूरमधील वर्दळीच्या जुन्या मुंबई- आग्रा रोडवर दुतर्फा वाढत्या अतिक्रमणांविषयी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. या प्रकारांमुळे कुणा निष्पापाचा बळी जाऊ नये म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याचाही प्रयत्न केला. त्यास रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या भाजी, फळफळावळ, तसेच भेळ, आईस्क्रीम व्यावसायिक, विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला नव्हता.