Dhule Teacher Bharti : शिक्षकभरतीबाबत पुढील प्रक्रिया राबविण्याची मागणी; लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Teacher Bharti : केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे.
Teacher Recruitment
Teacher Recruitmentesakal

Dhule Teacher Bharti : केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना अंमलबजावणीबाबत विनंती करण्यात आली आहे. शिक्षकभरतीबाबत पुढील प्रक्रिया राबविण्यासंबंधी जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षकभरतीबाबत निर्देश देण्यात आले आहेत. ( take action regarding appointment of teachers in polling places )

शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेली शिक्षकभरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती. मात्र, निवडणूक झालेल्या जिल्ह्यात शिक्षकभरतीची पुढील प्रक्रिया करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षकभरतीच्या कार्यवाहीबाबतची स्थानिक यंत्रणेला माहिती दिली. सर्व नियमांचे पालन करून फेरीनिहाय प्रशासकीय प्रक्रिया करण्याचे सूचित केले आहे.

दक्षतेने कार्यवाही

पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि तत्सम पदांतील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने, शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत न होण्याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीही लवकर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. (latest marathi news)

Teacher Recruitment
Dhule Teacher Protest: धुळ्यात ‘आवाज सुनो’ आंदोलन; महापालिकेचे निवृत्त शिक्षकांनी डफ वाजवून वेधले लक्ष

२०१७ च्या भरतीमधील २९ नोव्हेंबर २०२३ ला प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगनादेश उठविण्याच्या दृष्टीने अर्ज दाखल करण्याबाबत शासकीय अभियोक्त्यांना विनंती केली आहे. त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात असल्याचे नमूद केले आहे.

सावध राहण्याचे आवाहन

भरती प्रक्रियेमध्ये सुरवातीपासूनच काही व्यक्ती कोणतीही अधिकृत माहिती नसताना आणि प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णयप्रक्रिया अथवा नियमांची माहिती नसताना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यापासून सावध राहाण्याबाबत श्री. मांढरे यांनी निर्देशित सूचनेत स्पष्ट केले आहे.

Teacher Recruitment
Nashik Teacher Bharti : जिल्ह्यात 46 शिक्षण संस्थांमधील 296 जागांसाठी भरती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com