Bharat Jodo Nyay Yatra : दोंडाईचात भारत जोडो न्याययात्रेचे जोरदार स्वागत; धुळ्यात आज रोड शो

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेचे दोंडाईचा शहरात मंगळवारी (ता. १२) सायंकाळी पावणेसहाला आगमन झाले.
Police arrangements made at Chaufuli And the crowd of workers
Police arrangements made at Chaufuli And the crowd of workersesakal

Dhule News : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेचे दोंडाईचा शहरात मंगळवारी (ता. १२) सायंकाळी पावणेसहाला आगमन झाले. खासदार गांधी यांचा ताफा शहरात दाखल होताच नंदुरबार चौफुलीवर स्वागतासाठी काँग्रेसचे खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

खासदार राहुल गांधींसमवेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री व आमदार के. सी. पाडवी, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (Dhule Bharat Jodo Nyay Yatra received warm welcome in Dondaicha)

दोंडाईचा येथे चौफुलीवर खासदार गांधी थांबतील, अशी आशा होती, मात्र त्यांचा ताफा सरळ आप्पासाहेब मैदानावर गेल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निघाला. त्या ठिकाणी कुणालाही जाता आले नाही. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी बाहेर येऊन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. स्वागतासाठी आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पथकाने लक्ष वेधून घेतले.

गर्दी जास्त झाल्याने पोलिस प्रशासनाला कार्यकर्त्यांना आवर घालताना कसरत करावी लागली.दोंडाईचा शहरात पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, दोंडाईचा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार.

शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, विजय ठाकूर, उपनिरीक्षक हेमंत राऊत, चांगदेव हंडाळ, उमेश कुमावत, दीपाली पाटील यांच्यासह सीआरपी पथक यांच्यासह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (latest marathi news)

Police arrangements made at Chaufuli And the crowd of workers
Dhule News : हजार उमेदवार उभे करून सरकारची गळचेपी करू; धुळे जिल्हा सकल मराठा समाजाचा निर्धार

काँग्रेसकडून कार्यक्रमांची जय्यत तयारी

धुळे : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याययात्रेचे धुळे जिल्ह्यात मंगळवारी (ता. १२) आगमन झाले. बुधवारी (ता. १३) धुळे शहरात ही यात्रा पोचेल. येथे रोड शो, चौकसभा, महिला हक्क परिषद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने काँग्रेसतर्फे जय्यत तयारी झाली आहे. आपले नेते राहुल गांधी यांच्या जंगी स्वागतासाठी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज आहेत, तर जिल्हावासीयांत यात्रेबद्दल मोठी उत्सुकता आहे.

भारत जोडो न्याययात्रेसाठी रॅली मार्गासह धुळे शहरात विविध चौकात पक्षाचे झेंडे, बॅनर लागले असून, सर्वत्र काँग्रेसमय वातावरण निर्माण केले आहे. खासदार गांधी यांची रॅली, चौकसभा, महिला हक्क परिषदेच्या ठिकाणांची पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. आमदार पाटील यांच्यासह माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ.

अश्‍विनी पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे महेश मिस्तरी, काँग्रेसचे युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, ज्येष्ठ नेते प्रमोद जैन, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, राजेंद्र शिंदे, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, पंढरीनाथ पाटील, साबीर खान, पीतांबर महाले, राजीव पाटील, संचालक कुणाल पाटील, रावसाहेब पाटील, बापू खैरनार, हरीश पाटील, सागर पाटील आदींनी ही पाहणी केली.

न्याय्य हक्क परिषद

भारत जोडो न्याय यात्रेंतर्गत धुळ्यात न्याय्य हक्क परिषद होणार आहे. परिषदेला पंधरा हजार महिला उपस्थित राहतील, असा दावा काँग्रेसने केला आहे. गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे व अश्‍विनी पाटील या स्वतः या परिषदेच्या तयारीसाठी परिश्रम घेत आहेत.

Police arrangements made at Chaufuli And the crowd of workers
Dhule News : भीषण आगीत कापड दुकान खाक; 50 लाखांच्या नुकसानीचा अंदाज

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

भारत जोडो न्याययात्रेच्या निमित्ताने धुळ्यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. यात माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर, कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अशोक धात्रक, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रवक्ता अतुल लोंढे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष नाना गवांडे आदींचा यात समावेश आहे.

मोठा पोलिस बंदोबस्त

खासदार गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून शहरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांनीही रॅलीचा मार्ग व सभास्थळांची पाहणी केली.

यात्रेतर्गत कार्यक्रम असे

बुधवार (ता. १३) ः सकाळी ७.३०- खासदार राहुल गांधी दोंडाईचातून धुळ्याकडे रवाना, सकाळी ८.१५- चिमठाणे येथील क्रांतिस्मारकाला अभिवादन, सकाळी ९ ते १०.४५- सोनगीर, सरवड फाटा, देवभाने फाटा, नगाव, नगावबारी, दत्तमंदिर धुळे, एसएसव्हीपीएस कॉलेज, देवपूर मशीद या रॅली मार्गावर खासदार गांधी यांचे काँग्रेस व महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून स्वागत.

सकाळी ११ ते ११.३०- महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळादरम्यान पदयात्रा, दरम्यान, सकाळी ११.१०- कराचीवाला खुंट येथे शिवसेना ठाकरे गटाकडून श्री. गांधी यांचे स्वागत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे श्री. गांधी यांची चौकसभा, दुपारी १२.००- धुळ्यात वालचंद बापूजी ग्रुपचे देश-विदेश हॉटेल (रेसिडेन्सी हॉटेलसमोर, सुरत बायपायसजवळ) येथे महिला हक्क परिषदेला श्री. गांधी यांचे संबोधन.

Police arrangements made at Chaufuli And the crowd of workers
Rahul Gandhi In Nandurbar: 22 उद्योगपतींचे कर्ज मोदी सरकारने माफ केले; राहुल गांधींचा गंभीर आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com