धुळे: स्पोर्ट्स बाईक चोरी करून हैदोस माजविणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना निजमापूर (ता. साक्री) पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून तब्बल नऊ लाख २० हजार रुपये किमतीच्या १८ दुचाकी हस्तगत केल्या. दरम्यान, दोघा संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.