Municipal Election
sakal
धुळे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या येथील नेते, पदाधिकाऱ्यांची आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडीत कसोटी लागणार आहे. त्याचे कारण या निवडणुकीपूर्वी भाजपने येथे घेतलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात निरनिराळ्या उद्योगांतील काही अवैध व्यावसायिक, खून प्रकरणातील काही संशयित, त्यात शहरात प्रवेश बंदी असलेले आरोपी उपस्थित असल्याने शहरात उलटसुलट चर्चेला गंभीर वळण लागले आहे. याच पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असल्याने स्थानिक नेते, प्रमुख पदाधिकारी भाजपमधील राजकारणाचे गुन्हेगारीकरण कसे रोखतात, याकडे धुळेकरांचे लक्ष लागून आहे.