Dhule News : विखारी भाषणे ‘त्यांची’, फटका डॉ. भामरेंना! भाजपमधील बोलघेवड्यांमुळे नुकसानीचा निष्कर्ष

Dhule : लोकप्रतिनिधी नसताना आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने डॉ. सुभाष भामरे यांचे प्रत्येक समाजघटकाशी चांगले संबंध राहिले.
Dr. Subhash Bhamre
Dr. Subhash Bhamreesakal

Dhule News : लोकप्रतिनिधी नसताना आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने डॉ. सुभाष भामरे यांचे प्रत्येक समाजघटकाशी चांगले संबंध राहिले. २०१४, २०१९ च्या निवडणुकीत मोदी लाट, पक्षाचे पाठबळ यासह वैयक्तिक प्रेमापोटी यातील प्रत्येक समाजघटकातील काही ना काही मतदार डॉ. भामरेंच्या पाठीशी उभेही राहिले असतील. २०२४ मध्ये मात्र ते दुरावले? स्थानिक पातळीवर भाजपच्याच काही लोकांच्या विखारी भाषणांमुळे डॉ. भामरेंच्या ‘सर्वसमावेशी’ प्रतिमेला अप्रत्यक्ष तडा पडत गेला आणि हा तडाही डॉ. भामरेंना ‘अपयश' देऊन गेला, असा एक सूर ऐकायला मिळतो. (Dr Bhamre was narrowly defeated by only 3 thousand 831 votes )

त्यामुळे याचा विचार डॉ. भामरेंसह भाजपच्या स्थानिक लोकांनी करण्याची गरज व्यक्त होते. लोकसभा निवडणुकीच्या धुळे मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे यांचा केवळ तीन हजार ८३१ मतांनी निसटता पराभव झाला. अर्थात कोणत्याही निवडणुकीत एक-एक मत अमूल्य असते. त्यामुळे तीन हजार ८३१ मतांची त्या अर्थाने मोठी किंमत आहे.

मोदींच्या राजवटीत विजयी रथावर बेधुंद झालेल्या भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांसाठी मात्र तीन हजार ८३१ मते म्हणजे किस झाड की पत्ती...विशेषतः धुळ्यातील काही स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या अशाच अहंकाराचा फटका डॉ. भामरेंना बसल्याचे बोलले जात आहे.

आकडेवारीत स्पष्ट दुरावा

डॉ. भामरे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असले तरी खासदार होण्यापूर्वीपर्यंत ते आपल्या वैद्यकीय व्यवसायात स्थिरस्थावर होते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा सर्व समाजघटकाशी संबंध होता. राजकारणात त्यांना याचा फायदाच झाला. राजकारणात सक्रिय असतानाही ते विद्वेषाची भाषा बोलताना कधी दिसले नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये असूनही त्यांची वैयक्तिक प्रतिमा सर्वसमावेशक अशीच राहिली.

पण, पक्षातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विद्वेषी राजकीय भूमिका, विद्वेषी भाषेमुळे त्यांच्या या प्रतिमेस अप्रत्यक्षरीत्या हळूहळू तडा पडत गेला. परिणामी डॉ. भामरेंना वैयक्तिकरीत्या मानणारा अल्पसंख्याक व इतर समाजघटक त्यांच्यापासूनही दुरावत गेला. मतदानाची आकडेवारी पाहता त्याचाही फटका त्यांना बसल्याचे स्पष्टपणे दिसते. (latest marathi news)

Dr. Subhash Bhamre
Dhule News : हुश्श जून उगवला! 7 तारखेपासून मृग नक्षत्र; रेमल वादळ खानदेशात येण्यासाठी चातकासारखी प्रतीक्षा

...अन्यथा चित्र वेगळे असते

भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी आपल्या प्रत्येक भाषणात विशेषतः अल्पसंख्याक समाजाबद्दल तुच्छतेने बोलताना दिसतात. या समाजघटकाशिवाय आपण राजकारण करून सदासर्वकाळ विजयी होऊ, त्यांची आपल्याला काहीही गरज नाही, अशी काही पदाधिकाऱ्यांच्या भाषणाची धाटणी असते. भारतीय राजकारणात जातीय समीकरणे असतात. पण एका समाजाला आकृष्ट करण्यासाठी इतर समाजाला अगदीच दुर्लक्षित करून, तुच्छतेने वागणूक देऊन चालत नाही.

त्यातही जो समाजघटक निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो त्याला पूर्णतः दुर्लक्षित करणे, त्या समाजाबद्दल आक्रस्ताळेपणाने बोलणे राजकीय परिपक्वतेचे लक्षण नाही. डॉ. भामरेंनी आपल्या वैयक्तिक संबंधांवर जोडलेली अशीच काही माणसे त्यांच्याच पक्षाच्या काही स्थानिक बोलघेवड्या लोकांमुळे मात्र किमान मतदानापासून त्यांच्यापासून दूर गेल्याचे दिसते.

डॉ. भामरे यांनीही अशा बोलघेवड्या लोकांना लगाम घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले नाही. त्यामुळे अशी थोडी-थोडी माणसेही जोडून ठेवण्यात त्यांनाही एका अर्थाने अपयश आले. अन्यथा, तीन हजार ८३१ मतांचा हा छोटासा डोंगर त्यांना सहज पार करता आला असता.

...अन्यथा यापुढेही धडाच

राजकारणात एखाद्या विशिष्ट समाजाप्रति आक्रमक, विखारी भाषणे करून टाळ्या मिळतात, काही वेळा यशही मिळते. पण प्रत्येक वेळी यश मिळेल या आविर्भावात कुणी राहू नये. लोकशाहीत प्रत्येक समाजघटक मतदान करत असतो. त्यामुळे तो त्याचा राग मतदानातूनही व्यक्त करतो.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून असाच काहीसा राग देशभरात पाहायला मिळाला. अर्थात धुळे मतदारसंघही त्याला अपवाद नाही. त्यामुळे विद्वेषी राजकारण करून आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या धुळ्यातील राजकारण्यांनीही यातून धडा घ्यावा, असे लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निकाल दर्शवून जातो.

Dr. Subhash Bhamre
Dhule News : धुळे शहरात दीडशे इमारती धोकादायक! महापालिकेकडून संबंधितांना नोटिसा; काही इमारतींत नागरिकांचे वास्तव्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com