Dhule News : हुश्श जून उगवला! 7 तारखेपासून मृग नक्षत्र; रेमल वादळ खानदेशात येण्यासाठी चातकासारखी प्रतीक्षा

Dhule : खानदेशातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाला आहे. उष्णतेच्या लाटेने शेती शिवारातील कामे ठप्प झाली आहेत.
The water in the well has reached the bottom. The second photo shows a dried-up dam on the Bhat River.
The water in the well has reached the bottom. The second photo shows a dried-up dam on the Bhat River.esakal

Dhule News : खानदेशातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाला आहे. उष्णतेच्या लाटेने शेती शिवारातील कामे ठप्प झाली आहेत. अशात आता जून उगवला असून सात जूनपासून मृग नक्षत्रास प्रारंभ होईल. यामुळे शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत आहे. रेमल वादळाने शेतकऱ्‍यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. केरळमध्ये अंदाजाच्या एक दिवस अगोदरच मॉन्सून दाखल झालाय. आता राज्यातही लवकरच दाखल होऊन खानदेशात केव्हा आगमन होईल अन खानदेशात आनंदी आनंद घेऊन येईल, याकडेही साऱ्‍यांचेच लक्ष लागून आहे. (dhule mrug Nakshatra from 7th in district )

यंदा दुष्काळाने १९७२ च्या दुष्काळाची आठवण करून दिली आहे. खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव हे तिन्ही जिल्हे दुष्काळाने होरपळून निघाले आहेत. कधी नव्हे एवढी गावोगावी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती करावी लागत आहे. मोठ्या गावांमध्ये आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. तो ही पुरेसा पुरवठा होत नाही. (latest marathi news)

The water in the well has reached the bottom. The second photo shows a dried-up dam on the Bhat River.
Dhule News : पिंपळनेरमध्ये डोंगराची काळी मैना दाखल! रानमेव्याची दररोज हजारो-लाखो रुपयांची उलाढाल

सडगावात तीव्र पाणी टंचाई

धुळे तालुक्यातील सडगाव येथे पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. विहिरीवर पाणी भरण्यासाठी चोवीस तास झुंबड असते. बादलीभर पाणी मिळण्यासाठी मोठी अडचण होत आहे. शेती शिवारातील एका विहिरीवरुन पाणी मिळविण्यासाठी बैलगाड्यांच्या रांग लागलेली असते. पाण्याचा उपसा सुरु आहे. विहीर आटली अन पाणी मिळाली नाही. तर ग्रामस्थ तिथेच बैलगाडी रांगेत सोडून घरी येतात. अशी परिस्थिती बऱ्‍याचशा गावांमध्ये निर्माण झाली आहे.

ग्रामस्थ कधी नव्हे एवढ्या काटकसरीने पाण्याचा वापर करीत आहेत. वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापरही करीत आहेत. शेती शिवारातील गुरेढोरे गावाकडे दाखल झाली आहेत. तेथीलही सारेच स्रोत आटले आहेत. दरम्यान रेमल वादळामुळे शेतकऱ्‍यांच्या आशा मोठ्या प्रमाणात पल्लवित झाल्या आहेत. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र दुष्काळाने होरपळून निघालेले शेतकरी साशंकच आहेत.

The water in the well has reached the bottom. The second photo shows a dried-up dam on the Bhat River.
Dhule Crime News : वन विभागाच्या कारवायांमध्ये सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com