Dhule News : टँकरच्या पाण्याने टरबूज पीक जगविण्याचे शेतकऱ्याचे धाडस! टंचाईवर मात

Dhule : यंदा साक्री तालुक्यात दुष्काळसदृश स्थितीमुळे शेतीव्यवसाय अडचणीत आणि मोडकळीस निघाला आहे.
Tanker pumping water into a well for watermelon crop in Shiwar. In the second picture, Vaibhav Khairnar worships the watermelon crop.
Tanker pumping water into a well for watermelon crop in Shiwar. In the second picture, Vaibhav Khairnar worships the watermelon crop.esakal

Dhule News : यंदा साक्री तालुक्यात दुष्काळसदृश स्थितीमुळे शेतीव्यवसाय अडचणीत आणि मोडकळीस निघाला आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याअभावी उभे पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे बेहेड (ता. साक्री) येथील तरुण शेतकऱ्याने चक्क विकतचे पाणी टँकरद्वारे आणत साडेतीन एकर क्षेत्रात टरबूज जगविण्याचे धाडस केले आहे. साक्रीत शेतीसाठी लागणाऱ्या बी-बियाणे व कीटकनाशकाचे दुकान असणाऱ्या शेतकऱ्याचे धाडस मात्र दुष्काळावर मात करणारे आहे. ( courage of farmer to revive watermelon crop with tanker water)

यंदा दुष्काळामुळे बागायतदार शेतकऱ्यांनी ‘हात’ टेकले आहेत. विहिरींनी तळ गाठल्याने विहीर कोरणे, आडवे-उभे बोअर लावणे यांसारखे शर्थीचे प्रयत्न करत शेतकरी कष्टाची पराकाष्ठा करत आहेत. ‘आडात नाही तिथे पोहऱ्यात कुठून येणार’ या न्यायाने जलस्तर वाढण्याची शक्यता धूसर झाली आहे. पाण्याअभावी सर्वच शेतकऱ्यांची आर्थिक मदार असलेले पांढरे सोने अर्थात कपाशी लागवड होण्याची सुतराम शक्यता नाही. दुसरीकडे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवड झालेले कांदा पीक सोडून दिल्याची उदाहरणेही कमी नाहीत.

साडेतीन एकर क्षेत्राला टँकरचे पाणी

बेहेड (ता. साक्री) येथील युवा शेतकरी विशाल दिलीप खैरनार यांनी साडेतीन एकर क्षेत्रातील टरबूज पीक चक्क टँकरद्वारे पाणी आणत जगविण्याचे धाडस केले. बेहेड शिवारात श्री. खैरनार यांनी गट क्रमांक ३११ मध्ये २५ फेब्रुवारीस साडेतीन एकर क्षेत्रात बाहुबली, जिग्ना गोल्ड व अजित सीड्स टरबूज संकरित वाणांची लागवड केली.

सोळा-गाव काटवन भागातील बेहेड, विटाई, निळगव्हाण, दारखेल परिसरात दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असताना यंदा तर अवस्था बिकट आहे. तीन एकर क्षेत्रात टरबूज लागवड झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात विहिरीने तळ गाठला. जलस्तर सापडेल या अपेक्षेने बोअरही केला. तोही कोरडा गेला. अशा परिस्थितीत न खचता, संघर्ष करण्याची तयारी ठेवत टँकरने विकतचे पाणी आणून विहिरीत टाकून पाण्याची सुविधा उपलब्ध करून घेतली. (latest marathi news)

Tanker pumping water into a well for watermelon crop in Shiwar. In the second picture, Vaibhav Khairnar worships the watermelon crop.
Dhule News : विमान पाठवून कदमबांडे यांना बोलावले; शाहू महाराजांचे वारस; मोदींच्या कोल्हापूरमधील सभेस उपस्थित

सुमारे दीड महिना टॅंकरने पाणी देणे ही बाब अतिशय चिंताजनक, मनाला न पटणारी होती. सुमारे ३८० टँकर विकतचे पाणी पिकाला दिले. दुसरीकडे हे सर्व करत असताना त्यांनी बाजारभावाची कुठलीही चिंता बाळगली नाही. सरासरी सात ते आठ किलो वजनाचे फळ होते. बाजारभाव सरासरी केवळ साडेदहा रुपये प्रतिकिलो मिळाला. टँकरने पाणी टाकण्याचा खर्च दोन लाख रुपये, औषधे व खते बियाण्यास तीन लाख रुपये खर्च करण्यात आला.

साडेतीन एकर क्षेत्रात आठ लाख ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. खर्च काढून एकरी फक्त एक लाख रुपये नफा मिळाला आहे. पाण्याअभावी त्यांच्या उत्पादन खर्चात दोन लाख रुपयांचे पाणी लागल्यामुळे त्यांच्या निव्वळ नफ्यात दोन लाखांची घट झाली आहे. स्वत:च्या विहिरीत पाणी राहिले असते तर त्यांना दोन लाख रुपये अधिक नफा मिळाला असता.

बी-बियाणे दुकानांचा अनुभवही कामी

श्री. खैरनार यांचे साक्री शहरात वाय. जी. मोरे कृषी एजन्सी नामक बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकाचे दुकान आहे. अनेक वर्षांपासून कृषी सेवा केंद्राचा अनुभवही कामी आल्याची माहिती श्री. खैरनार यांनी दिली. हजारो शेतकऱ्यांना कृषी व्यवसायात ते मार्गदर्शन करत असतात. भविष्यात प्रत्येक शेतकऱ्याने जागृत राहून पाण्याची उपलब्धता पाहून शेती व्यवसाय करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

''यंदा अत्यल्प पावसामुळे सिंचनाचा प्रश्न जटिल झाला आहे. भविष्यात शासनाने सिंचनाचे प्रश्न सोडवावेत, तरच शेतकरी जगू शकतो. अन्यथा दुष्काळसदृश परिस्थितीत शेती करणे जिकिरीचे, संघर्षमय व खर्चिक होणार आहे एवढे मात्र नक्की.''-विशाल खैरनार, युवा शेतकरी, बेहेड

Tanker pumping water into a well for watermelon crop in Shiwar. In the second picture, Vaibhav Khairnar worships the watermelon crop.
Dhule News : प्रत्येक घंटागाडीला 4 ट्रिपचे बंधन; 1 मेपासून कार्यवाही सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com