Dhule Crime News : नकली मतदान कार्ड बनविणारे अटकेत; ‘एलसीबी’ची धडक कारवाई

Dhule Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोहाडी उपनगरात चक्क नकली मतदान ओळखपत्र तयार करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.
Police officers and team present during the inspection of seized material in case of fake voter card.
Police officers and team present during the inspection of seized material in case of fake voter card.esakal

Dhule News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोहाडी उपनगरात चक्क नकली मतदान ओळखपत्र तयार करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. नकली मतदान कार्ड तयार करणाऱ्या टोळीतील दोन संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने सोमवारी (ता. १) बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून बनावट मतदान कार्ड तयार करण्याचे ३५ हजारांचे साहित्य जप्त केले. शहरातील मोहाडी उपनगरातील भटाई माता रिक्षाथांब्याजवळ सूर्योदय फोटो स्टुडिओ आहे. स्टुडिओचालक सूर्यकांत दत्तात्रय कोकणे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, मोहाडी, धुळे) आहे. (Dhule crime Fake voter card makers arrested Strike action of LCB)

त्याच्या मदतीने विनोद नामदेव गरुड (रा. गायकवाड चौक, धुळे) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन आधार कार्डवरून संगणकाच्या आधारे रँडमली मतदार नंबर टाकून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नकली/बनावट मतदान कार्ड तयार करून शासनाची फसवणूक करत असल्याची माहिती सोमवारी (ता. १) पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली.

त्यांनी एलसीबीच्या पथकाला कारवाईचा आदेश दिला. पथकाने मोहाडीतील भटाई माता रिक्षाथांब्याजवळ सूर्योदय फोटो स्टुडिओवर छापा टाकला. स्टुडिओत १४ जणांचे नकली मतदान कार्ड तसेच मतदान कार्ड तयार करण्यासाठी लागणारा फोटो पेपर, संगणक, प्रिंटर, मोबाईल असे एकूण ३५ हजारांचे साहित्य मिळून आले.

Police officers and team present during the inspection of seized material in case of fake voter card.
Pune Crime News : कामगाराचा खून करणाऱ्या पर्यवेक्षकाला जन्मठेपेसह 5 हजाराची दंडाची शिक्षा

पथकाने ते जप्त केले. या प्रकरणी संशयित सूर्यकांत कोकणे व विनोद गरुड याच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, जप्त १४ जणांच्या मतदान ओळखपत्रांची तपासणी केली जात आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे प्रकाश पाटील, संदीप पाटील, सुरेश भालेराव, रवींद्र माळी, रविकिरण राठोड, नीलेश पोतदार, सुशील शिंदे, गुणवंत पाटील यांच्या पथकाने केली.

Police officers and team present during the inspection of seized material in case of fake voter card.
Pune Crime News : ‘हवेत उडणारे’ चोरटे अखेर जमिनीवर ; विमानाने पुण्यात येऊन चोरी करणारी राजस्थानमधील टोळी गजाआड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com