Dhule Crime News : अट्टल घरफोड्यांकडून साडेतीन लाखांचे सोने-चांदी हस्तगत; शिरपूर येथे घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस

Dhule News : शहर आणि परिसरात केलेल्या घरफोड्यांमध्ये चोरलेल्या दागिन्यांपैकी सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या लगडी हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले.
Inspector K. K. Patil with arrested suspect and material.
Inspector K. K. Patil with arrested suspect and material.esakal

Dhule News : शहर आणि परिसरात केलेल्या घरफोड्यांमध्ये चोरलेल्या दागिन्यांपैकी सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या लगडी हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Gold and silver worth three and a half lakh seized from burglars in Shirpur)

घरफोडीच्या प्रयत्नात असताना काही दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी राजेंद्रसिंह तथा राजन प्रीतमसिंह बर्नाला (वय २६) व ईश्वरसिंह नूरबिनसिंह चावला (२३, दोघे रा. उमर्टी, ता. वरला, मध्य प्रदेश) यांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यात ३१ मेस शहरातील साई समर्थनगरमध्ये प्रवीण मोरे यांच्याकडे झालेल्या घरफोडीस अन्य दोन घरफोड्यांमध्ये हात असल्याची कबुली संशयितांनी दिली.

या घरफोडीत हाती लागलेले सोन्या-चांदीचे दागिने चोपडा (जि. जळगाव) येथे मानक ज्वेलर्स या सराफाला विकल्याची माहिती त्यांनी दिली. शहर पोलिसांनी तेथे जाऊन वितळविलेल्या दागिन्यांपैकी तीन लाख ३० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड व आठ हजार ४० रुपये किमतीची चांदीची लगड हस्तगत करण्यात यश मिळविले. (latest marathi news)

Inspector K. K. Patil with arrested suspect and material.
Crime News : पैशाच्या वादातून साळ्याने केला जावयाचा खून

संशयितांकडून जप्त केलेली दुचाकीही भुसावळ येथून चोरल्याचे निष्पन्न झाले. संशयित सराईत गुन्हेगार असून, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती निरीक्षक के. के. पाटील यांनी दिली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे.

डीवायएसपी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के. के. पाटील, उपनिरीक्षक संदीप दरवडे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, मनोज महाजन, आरिफ तडवी, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज दाभाडे, रवींद्र महाले, नासीरखान पठाण यांनी ही कामगिरी बजावली.

Inspector K. K. Patil with arrested suspect and material.
Buldhana Crime : मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत जन्मठेप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com