Dhule Crime News : धामंधर, पोस्ट शेवगे, (ता. साक्री) येथील झिंगूबाई धाकलू गायकवाड (वय ३९) हीस पती धाकलू गायकवाड याने शुक्रवारी (ता.५) रात्री ११ वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत घरातील किरकोळ वादावरून लोखंडी ईळीत असलेल्या लाकडी काठीने डोक्यात खून केला. पिंपळनेर पोलिसात भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीला ताब्यात घेत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Husband arrested for murdering wife in drunkenness )
पती धाकलू चुनिलाल गायकवाड हा दारूच्या नशेत असताना झिंगूबाई व पती धाकलू यांचे भांडण झाले होते. झिंगूबाई ही पतीस शिवीगाळ करीत होती, त्याचा पतीला राग आल्याने जवळच पडलेली लोखंडी ईळीत असलेली लाकडी काठीने डोक्यात मारुन मारहाण केली, तरीही पत्नी पतीचे ऐकून घेत नव्हती यामुळे घरात पडलेली चार्जिंगचा बॅटरी उचलून पतीने झिंगूबाई हिच्या डोक्यात मारल्याने ती जमिनीवर पडली. त्यानंतर पतीही घरातील पुढच्या खोलीत झोपी गेला.
सकाळी उठल्यावर पत्नी झिंगूबाई हिस उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु ती उठली नाही, म्हणून पतीने घाबरून तिचे अंगावरील सर्व कपडे बदलले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी झिंगूबाई गायकवाड हिस तेथील लोकांचे मदतीने पिंपळनेर ग्रामिण रुग्णालय येथे आणले व तेथील डॉक्टरांनी झिंगूबाई गायकवाड हिस तपासून मृत घोषित केले. यामुळे पोलिसात भाऊ चंद्रू जगताप यांच्या फिर्यादीवरून पती धाकलू गायकवाड यास पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.