Dhule Crime News : मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा; राष्ट्रीय चर्मकार महासंघ

Dhule News : शहरातील चर्मकार समाजाच्या तरुणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करत अत्याचाराच्या घटनेमुळे चर्मकार समाजात संतापाची लाट आहे.
Crime
Crime esakal

Dhule News : शहरातील चर्मकार समाजाच्या तरुणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करत अत्याचाराच्या घटनेमुळे चर्मकार समाजात संतापाची लाट आहे. याप्रकरणातील आरोपीवर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी अन्यथा राज्यात प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन, मोर्चे काढण्याचा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाने दिला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले. (Dhule Crime Immediately arrest accused who molested girl)

शहरातील साक्रीरोड भागातील चर्मकार समाजातील २५ वर्षीय तरुणीला ५ एप्रिलला दुपारी सचिन अशोक पवार (रा. मिनाई सोसायटी, साक्री रोड, धुळे) याच्यासह अन्य एकाने बळजबरीने कारमधून पळवून नेले. तिला अज्ञातस्थळी नेऊन अत्याचार करत बेदम मारहाण केली.

तसेच तिला बेशुद्ध अवस्थेत महामार्गावर सोनगीर रस्त्यालगत सोडून पळाले. संबंधित तरुणीला उपचारासाठी धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Crime
Pune Crime : खंडणीसाठी तरुणीचे अपहरण करून खून, मृतदेह जाळून खड्ड्यात पुरला; तिघांना अटक

या घटनेबाबत धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल असून पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. आरोपींवर बलात्कार, अनुसूचित जाती जमाती अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली.

संघटनेचे भिवसन अहिरे, पांडुरंग वानखेडकर, विशाल वानखेडकर, कन्हय्या साखरे, रामेश्‍वर चत्रे, देवेंद्र जपसरे, डॉ. जयश्री वानखेडे, नंदिनी सौंदाणकर, सुनील सूर्यवंशी, किशोर काथेपुरी, राम रानडे, वाल्मीक जगताप आदींनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक दिले. मागण्यांच्या अनुषंगाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.

Crime
Nashik Bribe Crime : मालेगावी अव्वल कारकुनाला 22 हजार लाच घेताना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com