Dhule Crime News : डांगरी येथे तिघांवर चाकू हल्ला; संशयिताला न्यायालयीन कोठडी

Dhule Crime : तालुक्यातील डांगरी येथे एकाने तिघांवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (ता. २५) रात्री नऊ ते साडेनऊदरम्यान घडली.
Crime
Crime esakal

अमळनेर : तालुक्यातील डांगरी येथे एकाने तिघांवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (ता. २५) रात्री नऊ ते साडेनऊदरम्यान घडली. डांगरी येथील प्रकाश उत्तमराव शिसोदे व राजेंद्र भीमराव शिसोदे त्यांच्या अंगणात खाट टाकून रात्री गप्पा मारत असताना, गल्लीतील नाना रामभाऊ शिसोदे दोन-तीन वेळा त्यांच्याजवळून चक्कर मारून गेला. (Dhule Crime Knife attack on 3 in Dangri Suspect in judicial custody)

रात्री नऊ ते साडेनऊदरम्यान नाना पुन्हा परत आला आणि त्याने राजेंद्र शिसोदे यांच्या मागाहून येऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि अचानक हातातील चाकूने राजेंद्र याच्या पोटावर व हातावर चाकूने वार करू लागला. त्याला आवरण्यासाठी प्रकाश शिसोदे पुढे गेले असता, नाना ने त्यांच्याही पाठीवर वार केला.

तसेच प्रकाश यांचा मुलगा सारंग शिसोदे यांच्याही पोटावर वार करून गंभीर जखमी केले. तुम्हाला आज जिवंत ठेवत नाही, म्हणत पळून गेला. तिघे जण जखमी झाल्याने तेथे जमलेले अशोक चोथमल, प्रशांत चोथमल, शशिकांत चोथमल व इतरांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. (Latest Marathi News)

Crime
Crime News: कानात इअरफोन, हेल्मेट नाही! स्कूटरवरुन जाणाऱ्या 28 वर्षीय महिलेच्या मोबाईलचा स्फोट झाला अन्

सारंग आणि राजेंद्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले, तर प्रकाश शिसोदे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. प्रकाश शिसोदे यांच्या जबाबवरून मारवड पोलिस ठाण्यात नाना शिसोदेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, सुनील आगोणे, सुनील तेली, धनंजय देसले यांनी शुक्रवारी (ता. २६) पहाटे साडेचारला डांगरी येथे जाऊन संशयित नाना याला अटक केली. संशयित नानाला अमळनेर न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश स्वाती जोंधळे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Crime
Nashik Crime News : शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट! दुचाकी, चारचाकींसह रिक्षा चोरीचे प्रकार उघडकीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com