Dhule Crime News : धुळे तालुक्यात हातभट्ट्यांवर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Dhule Crime : धुळे तालुक्यात दोन ठिकाणी अवैध हातभट्ट्यांवर छापा टाकत ६८५ लिटर गावठी दारू, ११ हजार लिटर रसायन व इतर साहित्य असा सुमारे पाच लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
Officials, employees of State Excise Dhule Department along with seized goods by taking action on hand furnaces.
Officials, employees of State Excise Dhule Department along with seized goods by taking action on hand furnaces.esakal

Dhule Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गेल्या दोन दिवसांत धुळे तालुक्यात दोन ठिकाणी अवैध हातभट्ट्यांवर छापा टाकत ६८५ लिटर गावठी दारू, ११ हजार लिटर रसायन व इतर साहित्य असा सुमारे पाच लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात १४ हातभट्टी निर्मिती केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, १३ संशयितांना अटक करण्यात आली. (Dhule Crime Raid on hand furnaces in Dhule taluka State Excise Department action)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल व राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्त यू. आर. वर्मा यांच्या आदेशाने येथील अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रावर कार्यवाही करण्यात आली.

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहर व परिसरात हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री होते. त्या अनुषंगाने शनिवारी (ता. २३) रविवारी (ता. २४) निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक धुळे विभाग, महिला पोलिस कर्मचारी यांनी आर्णी व धनगरवाडी (ता. धुळे) येथील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापेमारी करून १४ हातभट्टी निर्मितो केंद्रांवर गुन्हे नोंद केले.

हातभट्टी दारूनिर्मितीसाठी लागणारे साहित्य, गूळमिश्रित रसायन, काळा गूळ व नवसागर व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणात एकूण १५ गुन्हे नोंद करण्यात आले असून, १३ संशयितांना अटक करण्यात आली.

Officials, employees of State Excise Dhule Department along with seized goods by taking action on hand furnaces.
Nagpur Crime: बँक व्यवस्थापकाच्या घरात जबरदस्ती शिरला ३१ वर्षीय तरुण अन्...धंतोलीतील थरारक घटना

जप्त मुद्देमाल

या कारवाईत एकूण ६८५ लिटर हातभट्टी गावठी दारू, १० हजार ९५५ लिटर रसायन, ७५० किलो काळा गूळ व इतर साहित्य असा एकूण पाच लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाचे कलम ६५ (ब, क, ड, फ, ई)नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, जनतेने हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्राबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक धुळेतर्फे करण्यात आले आहे.

Officials, employees of State Excise Dhule Department along with seized goods by taking action on hand furnaces.
Nashik Fraud Crime : मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगत 80 लाखांना गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com