Dhule Crime News : चोरीचा उलगडा, अट्टल चोर अटकेत! 12 दिवसानंतर घटनेची उकल; एलसीबीला यश

Crime News : नेहरू हौसिंग सोसायटीत २१ जूनला मध्यरात्री एकनंतर अभिजित अनिल सोनवणे यांच्या घराबाहेरील २३ हजारावर किमतीचे इलेक्ट्रीक साहित्य चोरट्यांनी लंपास केले.
Shriram Pawar, suspect and present with the goods in the case of theft in Devpur. Neighboring local crime branch team.
Shriram Pawar, suspect and present with the goods in the case of theft in Devpur. Neighboring local crime branch team. esakal

Dhule Crime News : जूनमध्ये देवपूर परिसरातील नेहरू हौसिंग सोसायटीत इलेक्ट्रीक साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याचा समांतर तपासात एलसीबीने बारा दिवसांत या घटनेची उकल करत दोन अट्टल चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. (Dhule Crime Theft solved thief arrested Success to LCB)

नेहरू हौसिंग सोसायटीत २१ जूनला मध्यरात्री एकनंतर अभिजित अनिल सोनवणे यांच्या घराबाहेरील २३ हजारावर किमतीचे इलेक्ट्रीक साहित्य चोरट्यांनी लंपास केले. यात शिलाई मशिन, दोन इन्व्हर्टर बॅटरी, पाण्याची मोटार, सिलींग फॅन, लहान बॅटरीचा समावेश होता. याप्रकरणी सोनवणे यांनी देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली.

एलसीबीचे पथक घटनेचा समांतर तपास करीत असताना हवालदार मुकेश वाघ, पोलिस नाईक शशिकांत देवरे यांना हा गुन्हा हरीश ऊर्फ सनी कैलास चौधरी (वय २३, रा. वीटभट्टी, देवपूर) याने त्याचा साथीदार सागर अरुण हटकर (रा. प्रशांत कॉलनी, धुळे) याच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोरीचा मुद्देमाल दिला. त्यांना देवपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (latest marathi news)

Shriram Pawar, suspect and present with the goods in the case of theft in Devpur. Neighboring local crime branch team.
Khaparkheda Crime : पैशावरून वाद विकोपाला गेल्याने मुलाने केला वडिलांचा खून

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक श्रीराम पवार, संजय पाटील, संतोष हिरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, पंकज खैरमोडे, शशिकांत देवरे, जितेंद्र वाघ, हर्षल चौधरी, महेंद्र सपकाळ यांनी केली.

Shriram Pawar, suspect and present with the goods in the case of theft in Devpur. Neighboring local crime branch team.
Wardha Crime : मित्राच्या पार्टीत मैत्रीण दिसताच संताप अनावर; मित्रावर केला हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com