धुळे: सोशल मीडियावर जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी संशयित तिघांविरोधात जिल्हा पोलिस प्रशासनाने वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल केला. सायबर पोलिस ठाण्याच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या सतर्कतेतून ही कारवाई करण्यात आली.