Dhule News : नालेसफाई होतेय, ‘डेब्रिस’चे काय? सुशीनाल्यातील अतिक्रमण निर्मूलनानंतर डेब्रिस अद्याप पडून

Dhule : महापालिकेकडून शहरातील नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले असले तरी काही ठिकाणी नाल्यातील डेब्रिस तसाच पडून असल्याने नालेसफाईला अर्थ राहील का, असा प्रश्‍न आहे.
Cleaning of drains is going on by JCB in the city by Municipal Corporation.
Cleaning of drains is going on by JCB in the city by Municipal Corporation.esakal

Dhule News : महापालिकेकडून शहरातील नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले असले तरी काही ठिकाणी नाल्यातील डेब्रिस तसाच पडून असल्याने नालेसफाईला अर्थ राहील का, असा प्रश्‍न आहे. मागील वर्षी देवपूर भागात नाल्यातील अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र, कारवाईनंतर अतिक्रमण काढलेल्या घरांचा राडारोडा (डेब्रिस) तसाच पडून राहिला. हा डेब्रिस आजही तसाच पडून आहे. त्यामुळे समस्या निर्माण होण्याचा धोका कायम राहील, अशा तक्रारी आहेत. ( Debris still lying after clearance of encroachment in Sushi drainage )

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई आवश्‍यक असते. दर वर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेकडून नालेसफाईला सुरवात झाली आहे. काही भागात नालेसफाईचे काम सुरू आहे. बहुतांश ठिकाणी जेसीबी, पोकलेनद्वारे नालेसफाईचे काम करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ही यंत्रसामग्री पोचू शकत नाही अशा ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांकडून नाले साफसफाई करण्यात येत आहे.

यंदा शंभर टक्के नालेसफाईचे महापालिकेचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने काम सुरू केल्याचे महापालिकेचे अधिकारी म्हणतात. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने शंभर टक्के नालेसफाई झाली तर शहरवासीयांसाठी त्यातही विशेषतः नालाकाठावरील रहिवाशांसाठी दिलासा असणार आहे. (latest marathi news)

Cleaning of drains is going on by JCB in the city by Municipal Corporation.
Dhule News : जिल्हा बँकेतर्फे 263 कोटींचे खरीप पीककर्ज! धुळे- नंदुरबारच्या 22 हजारांवर सभासद शेतकऱ्यांना लाभ

मागील वर्षाचा डेब्रिस पडून

नालेसफाईदरम्यान केवळ नाल्यातील पाणी प्रवाहित करून नालेसफाई झाली असे दाखविले गेले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यासाठी नाल्यातून काढलेले घाण, माती व इतर कचरा तेथून उचलला गेला पाहिजे. काही ठिकाणी या कामाला मात्र अडचणी असल्याचे सांगितले जाते. मागील वर्षी देवपूर भागातील सुशीनाला काठावरील अतिक्रमण महापालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आले होते.

मात्र कारवाईनंतर तेथील घरांचा डेब्रिस तसाच पडून होता. हा डेब्रिस उचलला गेला नाही तर जास्त पाऊस झाला तर नाल्यात पाणी तुंबेल व त्यामुळे समस्या निर्माण होतील अशा तक्रारी त्या भागातील नगरसेवकांनी महापालिकेच्या तत्कालीन स्थायी समिती सभांमध्ये केल्या होत्या. हा डेब्रिस तेथून उचलण्यात यावा, अशी मागणी झाली. मात्र, संबंधित ठिकाणी अतिक्रमणाचे हे डेब्रिस तेथून उचलले गेले नाही.

आजही ते तेथेच पडून असल्याने समस्या कायम आहे. संबंधित ठिकाणचा डेब्रिस उचलण्यासाठी त्या ठिकाणी कोणतेही वाहन जाऊ शकत नाही अशी स्थिती असल्याचे अधिकारी म्हणतात. त्यामुळे यंदाही नाल्यातून काढलेला कचरा, माती तेथेच टाकली जात असल्याचे सांगितले जाते. इतर ठिकाणीदेखील केवळ नाला प्रवाहित करून तेथील कचरा नाल्याच्या काठावरच लावला जात असेल तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. याबाबत महापालिकेच्या यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.

Cleaning of drains is going on by JCB in the city by Municipal Corporation.
Dhule Crime News : 5 पिस्तुले, 11 काडतुसांसह जालन्याच्या दोघांना अटक; पोलिस अधीक्षकांकडून सांगवी पोलिसांचे कौतुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com