Dhule News : जिल्हा बँकेतर्फे 263 कोटींचे खरीप पीककर्ज! धुळे- नंदुरबारच्या 22 हजारांवर सभासद शेतकऱ्यांना लाभ

Dhule News : धुळ व नंदुरबार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दहा एप्रिलपासून हा लाभ दिला जात आहे.
District Bank Dhule Nandurbar
District Bank Dhule Nandurbaresakal

Dhule News : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आगामी खरीप हंगाम पीककर्जासाठी धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे २२ हजार १०९ शेतकरी सभासदांना आतापर्यंत २६२ कोटी ९४ लाख रूपयांचा लाभ दिला आहे. उर्वरित कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली. ‘प्रथम कर्ज भरणा, प्रथम नवीन कर्ज प्राप्ती’ या धोरणानुसार कर्ज वाटप होत आहे. रूपे केसीसी कार्ड बंद करण्यात आले आहे. (Dhule Kharif crop loan of 263 crores by District Bank Dhule Nandurbar benefit to 22 thousand member farmers marathi news)

धुळ व नंदुरबार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दहा एप्रिलपासून हा लाभ दिला जात आहे. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणा केलेल्या नियमित शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराची सवलत दिली आहे. धुळे जिल्ह्यातील १५ हजार ५२८ शेतकऱ्यांना १६५ कोटी ७३ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार ५८१ शेतकऱ्यांना ९७ कोटी २१ लाखांचे पीककर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे.

पीककर्जावर शून्य टक्के व्याजदर असताना गेल्या पाच वर्षांत अंदाजे ११ हजार शेतकऱ्यांनी भरणा केलेला नाही. यामुळे बँकेची अंदाजित ३७ कोटींची थकबाकी अडकली आहे. परिणामी, बँकेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

९३ टक्के वसुली

ज्या शेतकऱ्यांनी १६ मार्चपर्यंत मुद्दल व्याजाचा कर्ज भरणा केला आहे, त्याचे व्याज दोन कोटी ३१ लाख बँकेने दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बचत खाती जमा केले आहे. मार्च २०२४ अखेर यंदा पीककर्जाची ९३ टक्के धुळे जिल्ह्यात वसुली झाली आहे.

धुळे जिल्ह्यात मुख्य शाखेसह ८० शाखा कार्यरत आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक विविध कार्यकारी, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना बँकेमार्फत वैयक्तिक पीककर्ज घेणाऱ्या सर्व सभासद, सर्वसामान्य सभासदांना बँकेतर्फे नवीन पीककर्जाबाबत माहिती दिली आहे. (latest marathi news)

District Bank Dhule Nandurbar
Wedding Ceremony Fashion : किंमती वस्त्रे विवाहानंतर ठरतात आठवणीपुरतेच! फॅशनच्या नावाखाली दुष्काळातही खर्च वाढताच

धोरणाप्रमाणे कर्ज वाटप

धुळे व नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तांत्रिक समितीनुसार पीककर्ज दरास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये प्रतिहेक्टरी कापसाला ८० हजार, केळीला नऊ लाख २६ हजार, पपईला एक लाख २० हजार, नाबार्डच्या धोरणाप्रमाणे बँक पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मच्छीमारीसाठीच्या नवीन पर्सनलाईज्ड डेबिट कार्डद्वारे जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने निश्चित केलेल्या दरानुसार पीकर्ज वाटप केले आहे.

बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार बॅक कृषीपूरक उद्योगासाठी व्यक्तिगत व सहकारी संस्थामार्फत २०२४-२०२५ च्या पीककर्ज वाटप रकमेच्या ७५ टक्के रक्कम कन्झम्शन कर्ज म्हणून देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज बाकी आहे, त्यांनी भरणा करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन संचालक मंडळाने केले.

"धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ५० हजार शेतकरी सभासद आहेत. त्यांना पर्सनलाईज्ड एटीएम वेळेवर होऊ शकत नव्हते, त्यामुळे धनादेशाद्वारे पैसे देण्याचा निर्णय झाला. यंदा शेतकऱ्यांना एटीएमद्वारे पेमेंट न करता बँकेच्या धनादेशाद्वारे तत्काळ पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. वाढत्या थकबाकीच्या दृष्टिकोनातून बँकेच्या कर्ज सुरक्षिततेसाठी शेतकरी सभासदांकडून तीन धनादेश घेण्यात आले आहेत. नाबार्डच्या सूचनेनुसार पर्सनलाईज्ड एटीएम डेबिट कार्डद्वारे कर्ज वितरण होणार आहे."

- धीरज चौधरी, सीईओ, धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँक

District Bank Dhule Nandurbar
Amit Shah Dhule Sabha : गृहमंत्री अमित शहांची सोमवारी धुळ्यात सभा! डॉ. सुभाष भामरे यांचा प्रचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com