धुळे- राज्यासह जिल्ह्यात पवित्र पोर्टलव्दारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, राज्यातील पेसा क्षेत्र समाविष्ट असलेले ८ जिल्हे या प्रक्रियेपासून वंचित राहण्याचे चिन्ह असून त्यात धुळे व नंदुरबारचा समावेश आहे. .यात केवळ मागास वर्ग कक्षाने आरक्षणाविषयी माहिती `अपडेट` केली नसल्याने ८ जिल्हे शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीला मुकणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये संतापाची लाट असून येत्या शैक्षणिक वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. समाज घडविणाऱ्या या क्षेत्राकडे जिल्ह्यातील सर्व आमदारांचेही दुर्लक्ष असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र आहे..पवित्र पोर्टलमध्ये रिक्त जागांवरील शिक्षक भरतीसाठी धुळे जिल्ह्यातील एकाही संस्थेचा समावेश नसल्याने प्रतिक्षेतील उमेदवार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अस्वस्थता आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत शिक्षक भरती झाली नाही, तर संबंधित शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतील की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण संस्था संकटात, तर बोटोवर मोजण्याइतक्या शिक्षकांना अतिरिक्त ठरण्याची भिती वाटू लागली आहे. .राज्यात २०२४ नंतर नव्याने शिक्षक भरती होत नसल्याने असंख्य शाळांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. समाज घडविणाऱ्या शैक्षणिक क्षेत्राकडे जिल्ह्यातील कुठल्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने हजारो गरीब, सामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात लोटले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे..२ मेपर्यंत लॉगिन खुले‘शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२’ मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर, ग्रामपंचायत व खासगी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना आपले प्राधान्यक्रम (पसंतीच्या जागा) तयार करून ते लॉक करता यावेत यासाठी पवित्र पोर्टलवर शुक्रवारपासून सुविधा सुरू झाली आहे. .ती २ मेपर्यंत खुली राहणार आहे. या टप्प्यात शिक्षक पदे भरताना त्या- त्या शाळांतील रिक्त जागा, इयत्ता, विषय, माध्यम, आरक्षण, परीक्षेत मिळालेले गुण आणि उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम या सर्वांचा एकत्रित विचार करून संगणकीय पद्धतीने निवड केली जाणार आहे. टीईटीच्या २०२२- २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेतील वेळेत स्व-प्रमाणपत्र सादर करून मान्यता घेतल्यांनाच दुसऱ्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर लॉगिनची सुविधा मिळणार आहे..विद्यार्थी भवितव्य धोक्यातराज्य शासनाच्या या निर्णयापासून पेसा क्षेत्र समाविष्ट असलेले ८ जिल्हे वंचित राहणार आहेत. त्यात साक्री व शिरपूर तालुका पेसा क्षेत्रात येत असल्याने धुळे जिल्हा शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पवित्र पोर्टलवर धुळे जिल्ह्यातील एकाही संस्थेचे नाव नसल्याने नोकरीच्या प्रतिक्षेतील शिक्षक उमेदवारांमध्ये कमालिची नाराजी आहे. .पवित्र पोर्टलमध्ये जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांची नावे येण्यासाठी नाशिक विभागीय मागास वर्ग कक्षाने आरक्षणाविषयी माहिती `अपडेट` करणे गरजेचे आहे. परंतु, या कक्षाने आरक्षण तपासण्याची प्रक्रिया राबविली किंवा नाही की राज्य शासनाकडूनच तसे निर्देश देण्यात आलेले नाहीत याबाबत चौकशी झाली पाहिजे, अशी नाराजांची मागणी आहे. खरे तर समाज आणि जिल्हा घडविणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील या समस्यकडे आमदार, खासदारांनी वेळोवेळी लक्ष घातले पाहिजे. अन्यथा, हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात लोटले जाईल. (क्रमशः).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.