Dhule News : रडगाणे थांबवा, विकासाच्या एक्सप्रेस-वेवर स्वार व्हा! धुळे जिल्हा बनतोय देशाचे 'नेक्स्ट इंडस्ट्रियल हब'
Why Dhule Needs Positive Rebranding : नरडाणा एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आणि औद्योगिक गुंतवणुकीमुळे धुळे जिल्ह्याची विकासात्मक ओळख वेगाने बदलत आहे.
धुळे जिल्ह्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आता बदलायला हवा. मुबलक पाणी, सहा राष्ट्रीय महामार्गांचे जाळे, विमानतळांसह रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणि ‘धुळे- नरडाणा’सारखे उद्याचे जागतिक औद्योगिक केंद्र ही जिल्ह्याची नवी ओळख बनू पाहत आहे.