धुळे: शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे धुळे शहरासह जिल्ह्यात सर्रास उल्लंघन होताना दिसते. त्यामुळे धुळेकरांच्या मनातील तीव्र भावनांचा वेध घेत ‘आयएमए’ या वैद्यकीय संघटनेने दणदणाट करणाऱ्या ‘डीजे’वर कठोर कारवाई करावी, दोषींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. कर्णकर्कश ‘डीजे’बाबत ११२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन करत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी हमी दिल्याची माहिती ‘आयएमए’ने दिली.