धुळे: शहरातील पांझरा नदीकिनारी श्री शीतलामाता मंदिराजवळ दाता सरकारकडे तोंड करून कर्कश आवाजातील स्पर्धा करून डीजे वाजविणे दोघांना महागात पडले आहे. याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही डीजेची वाहने जप्त केली. तसेच दोन्ही डीजे वाहनाचे चालक व डीजे ऑपरेटर, अशा चौघांवर गुन्हा दाखल केला.