धुळे: दुहेरी हत्त्याकांडातील दोघा आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. देवपूरमधील रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील या पितापुत्राचा ८ जून २०१८ ला खून झाला होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्यापुढे सुरू आहे.