Dhule Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: धुळ्यात प्रकटला ‘भीम’ उत्साह! आंबेडकर जयंती जल्लोषात; रॅलीसह विविध उपक्रम

Dhule News : शहरातील जेल रोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारकस्थळी अभिवादनासाठी दिवसभर जनसागर उसळला.
Vishwaratna Dr. On the occasion of Babasaheb Ambedkar Jayanti, ex-servicemen saluting the full-length Ambedkar statue at Jail Road on Sunday.
Vishwaratna Dr. On the occasion of Babasaheb Ambedkar Jayanti, ex-servicemen saluting the full-length Ambedkar statue at Jail Road on Sunday. esakal

Dhule Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : निरभ्र निळे आकाश, निळे झेंडे, निळ्या पताका, निळे फेटे आणि मस्तकी टिळाही निळाच अशा वातावरणात शहरासह जिल्हा रविवारी (ता. १४) न्हाऊन निघाला. निमित्त होते विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे.

रॅली, मिरवणूक, चौकाचौकांत भीमगीते, सेवाभावी उपक्रमातून आणि ‘जय भीम’च्या जयघोषाने भारावलेल्या वातावरणात ‘भीम’ उत्साह प्रकटला. शहरातील जेल रोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारकस्थळी अभिवादनासाठी दिवसभर जनसागर उसळला. (Dhule Dr Babasaheb Ambedkar Jayanti Bhim enthusiasm manifested marathi news)

आंबेडकर जयंतीमुळे अनुयायांसह कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अलोट उत्साहात विविध चौक, भागांमध्ये निळे झेंडे फडकत होते. सकाळपासूनच विविध पक्ष, संघटना, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांचे जथ्ये डॉ. आंबेडकर पुतळा स्मारकाजवळ अभिवादनासाठी येत होते. यात सुरवातीला बुद्धवंदना झाली. नंतर महामानव आंबेडकरांवर पुष्पवृष्टी करत अभिवादन झाले. महामानवासमोर जनसागर नतमस्तक झाला.

यंदा साकारली रांगोळी

यंदा प्रथमच जेल रोडवरील देव महिला हॉस्टेलच्या जागेवर ६० बाय ४० फूट आकाराची डॉ. आंबेडकरांची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली. जयंतीनिमित्त विविध संघटनांकडून विधायक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. शहरात बाइक रॅली निघाली. मध्यरात्री बाराला शहरातील विविध भागांत आतषबाजीतून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले गेले. चौकाचौकांत डीजेवर भीमगीते थिरकत होती.  (latest marathi news)

Vishwaratna Dr. On the occasion of Babasaheb Ambedkar Jayanti, ex-servicemen saluting the full-length Ambedkar statue at Jail Road on Sunday.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डीजेच्या दणदणाटात मिरवणूक; कडेकोट पोलिस बंदोबस्त

विविध संघटनांकडून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खासदार डॉ. सुभाष भामरे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन, महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, आमदार कुणाल पाटील, आमदार फारूक शाह, दलित नेते वाल्मीक दामोदर, ज्येष्ठ मीना बैसाणे, वंचित आघाडीचे अर्ब्दुर रहेमान, दिलीप साळवे, शोभा चव्हाण, मधुकर शिरसाट, शशिकांत वाघ आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी स्मारकस्थळी अभिवादन केले.

Vishwaratna Dr. On the occasion of Babasaheb Ambedkar Jayanti, ex-servicemen saluting the full-length Ambedkar statue at Jail Road on Sunday.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: आसमंतात घुमला ‘जयभीम’ नारा; शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com