Dhule Road Damage : ट्रकचे टायर फुटल्याने दुकानाच्या काचा खळ्ळऽऽ! रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नुकसान

Road Damage : स्टेट बँकेजवळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ट्रकचा टायर फुटल्याने दुकानांच्या काचांचे नुकसान झाले.
A broken tire of a truck due to bad road condition. In the second photo, the damage to the glass of the shop due to the bursting of tires and flying gravel.
A broken tire of a truck due to bad road condition. In the second photo, the damage to the glass of the shop due to the bursting of tires and flying gravel.esakal

Dhule Road Damage : येथील स्टेट बँकेजवळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ट्रकचा टायर फुटल्याने दुकानांच्या काचांचे नुकसान झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. साक्री-पिंपळनेर-सटाणा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जी ७५२ वरील पिंपळनेर बसस्थानक ते जेटी पॉइंटपर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावर माती व खडीचा भराव टाकण्यात आला आहे. ( Due to bad condition of road tires of the truck burst and windows of shop were damaged)

रस्त्यावरून स्टेट बँकेजवळ बुधवारी (ता. १५) दुपारी वाळूचा ट्रॉला जात असताना टायर खड्ड्यामध्ये जाऊन त्यात खडी भरल्याने टायरचा मोठ्याने स्फोट झाला व रस्त्यावरील खडी रस्त्यालगत असलेल्या जीत कलेक्शन या कापड दुकानाच्या पुढील भागात लावलेल्या काचेवर जाऊन आदळली. यामुळे पूर्ण काचेचे नुकसान झाले, तसेच लगत असलेल्या प्रगती मेडिकल व प्रगती सेतू यांच्या दुकानाचे काचेचेही नुकसान झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

या वेळी नागरिकांनी रोष व्यक्त केला. मागील वर्षी रस्त्यासंदर्भात आमदार मंजुळा गावित यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त होण्यास आदेश केले होते. मात्र एक वर्ष उलटूनही व वेळोवेळी आंदोलन, उपोषण करूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. (latest marathi news)

A broken tire of a truck due to bad road condition. In the second photo, the damage to the glass of the shop due to the bursting of tires and flying gravel.
Jalgaon Road Damage: शहरातील चौपदरी महामार्गाची वर्षभरात लागली वाट! खर्च, तक्रारींबाबत NHAIचे हात वर

पिंपळनेर बसस्थानक ते जे.टी. पॉइंटपर्यंतचा रस्ता अतिशय जीवघेणा झाला आहे. मोठमोठे खड्डे पडले असून, रात्रंदिवस धुळीचे लोट उठत असल्यामुळे वाहनधाकरांसह नागरिक, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. हा रस्ता न्यायप्रविष्ट असल्याने काँक्रिटीकरणाचे काम बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. हा गावातील प्रमुख मार्ग आहे. पिंपळनेर व परिसरातील नागरिकांची व वाहनांची रात्रंदिवस वर्दळ सुरू असते.

या रस्त्यावरील काही अतिक्रमणांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या रिट पिटिशनच्या याचिकेच्या कारणास्तव हे काम बंद आहे. मात्र येथील असंख्य व्यावसायिक व नागरिकांच्या आरोग्याला घातक अशा धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील नागरिकांनी वेळोवेळी जिल्हा व मंत्रालयापर्यंत तक्रारी अर्ज केले.

आंदोलने, उपोषणेदेखील केली, मात्र हा वाद कोर्टात असल्यामुळे रस्ता दुरुस्तीस अडचण निर्माण झाली आहे. उपोषणादरम्यान एप्रिलअखेर रस्ता दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मे महिना अर्धा होऊनही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने नागरिकांतर्फे रोष व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसून येत आहे.

A broken tire of a truck due to bad road condition. In the second photo, the damage to the glass of the shop due to the bursting of tires and flying gravel.
Jalgaon Damage Road: जळगाव- भुसावळ महामार्गावर खड्डेच खड्डे! रात्रीचे पथदिवे बंद, साइडपट्ट्या नाहीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com