Cyber Police Intensify
sakal
धुळे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. यासाठी नियमित पोलिस दलाबरोबरच सायबर पोलिस ठाण्याची विशेष पथके ‘तिसरा डोळा’ म्हणून कार्यरत झाली आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सायबर पेट्रोलिंग सुरू असून, संभाव्य गुन्हे आणि अफवा वेळीच रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.