Crime
sakal
धुळे: येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शिरपूर तालुक्यात कारवाई करीत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरीत्या आणली जाणारी लाखों रुपये किमतीची बियर आणि ती वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण तीन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मुख्य आरोपी मात्र अंधारात पसार झाला.