Dhule News : रानडुकरांकडून शेवगा पिकासह ठिबकच्या नळ्या, ड्रिपरची नासाडी; शेतकऱ्यांची तक्रार

Dhule : वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतशिवारात रानडुक्करे उभी पिके आणि ठिबकच्या नळ्या, ड्रिपरची नासाडी करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.
field Damage caused by wild boars
field Damage caused by wild boarsesakal

Dhule News : यंदा अत्यल्प पावसामुळे शेतीव्यवसाय अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे उपलब्ध पाण्यावर शेतकरी रब्बी पिकासह फळ आणि भाजीपाला पिके जगविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतशिवारात रानडुक्करे उभी पिके आणि ठिबकच्या नळ्या, ड्रिपरची नासाडी करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. तक्रार करूनही वन विभाग हात वर करत असल्याचे चित्र आहे.

येथील वनक्षेत्राला लागून असलेल्या दोमदेर शिवारात वीरेंद्र सुधाकर देवरे यांच्या तीन एकर क्षेत्रात नुकत्याच लागवड झालेल्या शेवगा पिकाची रानडुकरे नासाडी करत असल्याने शेतकरी वैतागला आहे.

लावलेली रोपे, ठिबकच्या नळ्या, ड्रिपरची नासाडी होत असल्याने शेतकऱ्याने वन विभागाकडे तक्रार केली असता वनपाल डी. जी. पगारे, वसंत खैरनार यांनी पाहणी केली. शासन रानडुकरांच्या नुकसानीची भरपाई देत नसल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

पाण्यासाठी रानडुकरेही सैरभैर..!

यंदा पावसाचे प्रमाण अगदी नगण्य होते. म्हणून वनक्षेत्रात कोठेही पाण्याचा टिपूस नाही. पाणवठे कोरडेठाक पडल्याने वन्यपशू बिबट्यासह तरस, वानरे, कोल्हे, ससे, रानडुकरे‌ व मोर, तितर, कबुतरे यांसारखे पक्षीही पाण्यासाठी महसूल क्षेत्रात येतात. पावसाळ्यात दमदार पाऊस झाला तर वनक्षेत्रातील पाणवठ्यात वर्षभर पाणी असते.

यंदा अत्यल्प पावसामुळे शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. कूपनलिका आटू लागल्या आहेत. एप्रिल, मे महिन्यात तीव्रता अधिक असणार आहे. तोकड्या पावसामुळे शेतकरी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत पिके जगविण्यासाठी आटापिटा करत आहेत. दुसरीकडे पाण्यासाठी रानडुकरे ठिबकच्या नळ्या, ड्रिपरची नासाडी करत आहेत.

field Damage caused by wild boars
Dhule Municipality News : करवसुलीप्रश्‍नी 3 गाळे मनपा पथकाकडून ‘सील’!

वनक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करावी

वन विभागाने वनक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वीरेंद्र देवरे यांनी केली आहे. दुसरीकडे आज पाणवठे तयार करणे शक्य असले तरी आडात नाही तिथे पोहऱ्यात कुठून येणार हाही प्रश्न आहेच. ठिकठिकाणी हौद बांधून त्यात पाणी टाकून वन्यपशूंची तहान भागविणे शक्य असल्याचे श्री. देवरे यांनी स्पष्ट केले.

मनरेगातून अशी कामे केली जात असल्याची माहिती वन विभागाकडून दिली जाते. शेती व इतर कामांसाठीची मजुरी आणि मनरेगाच्या कामाच्या दिल्या जाणाऱ्या मजुरीत तफावत असल्याने वेळेत मजूर मिळणे अवघड असल्याचे वास्तव आहे.

दर वर्षी वन विभागाने वनक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, जेणेकरून पाण्यासाठी सैरभैर झालेली रानडुकरे शेतीची नासधूस करणार नाहीत.

field Damage caused by wild boars
Dhule News : 2 हजार भाविकांतर्फे रामलल्लाचे दर्शन; धुळ्याहून अयोध्येसाठी विशेष रेल्वे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com