Dhule News : 2 हजार भाविकांतर्फे रामलल्लाचे दर्शन; धुळ्याहून अयोध्येसाठी विशेष रेल्वे

Dhule : संसदरत्न डॉ. सुभाष भामरे यांनी स्वखर्चाने सहा विधानसभा मतदारसंघांतील दोन हजार भक्तांना अयोध्येतील श्रीरामलल्लाचे मोफत दर्शन घडविले.
Devotees' jubilation in train Dr.Subhash Bhamre present at this time.
Devotees' jubilation in train Dr.Subhash Bhamre present at this time. esakal

Dhule News : अयोध्येत तब्बल पाच शतकांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर साकारल्यावर देशातील प्रत्येक भाविकाला अयोध्येतील मंदिराला भेट देऊन श्री रामलल्लांच्या दर्शनाची आस लागली आहे.

या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार, संसदरत्न डॉ. सुभाष भामरे यांनी स्वखर्चाने सहा विधानसभा मतदारसंघांतील दोन हजार भक्तांना अयोध्येतील श्रीरामलल्लाचे मोफत दर्शन घडविले.(darshan of Shri Ram in Ayodhya)

धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव शहर, मालेगाव बाह्य व बागलाण मतदारसंघातील भाविकांनी हा लाभ घेतला. यासाठी खासदार डॉ. भामरे यांनी धुळे ते चाळीसगावदरम्यान विशेष मेमू ट्रेन तसेच चाळीसगाव ते अयोध्येपर्यंत व पुन्हा परतीच्या प्रवासासाठी अयोध्या ते चाळीसगाव अशी स्वतंत्र आस्था विशेष रेल्वेची तसेच चाळीसगाव ते धुळेदरम्यान मेमू ट्रेनची व्यवस्था करून दिली.

अयोध्येतील प्रभू श्रीरामलल्लाचे दर्शन घेत श्रीरामचरणी नतमस्तक झालेल्या दोन हजार भक्तांनी खासदार डॉ. भामरे यांनी मोफत प्रवासासह सलग तीन दिवस पाणी, चहा-नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था करून दिल्याने त्यांना भरभरून आशीर्वादही दिले.

राममय वातावरण

धुळे येथील रेल्वेस्थानकातून १६ फेब्रुवारीला भाविक रवाना झाले. त्यांच्या घोषणांनी वातावरण राममय झाले. ते रविवारी (ता. १८) सकाळी दहाला अयोध्येत पोचले. त्यांनी जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. अयोध्या रेल्वेस्थानकातून सर्व भक्तांना सुमारे शंभर बसने खासदार डॉ. भामरे यांच्यातर्फे करण्यात आलेल्या निवास व्यवस्थेच्या ठिकाणी नेण्यात आले.

नंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी नेण्यात आले. विशेष दर्शन व्यवस्थाही खासदारांनी करून दिली. श्री रामलल्लाचे दर्शन घेतानाच भक्त भारावले. त्यांना अयोध्येतील विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी नेण्यात आले.

Devotees' jubilation in train Dr.Subhash Bhamre present at this time.
Dhule Municipality News : करवसुलीप्रश्‍नी 3 गाळे मनपा पथकाकडून ‘सील’!

श्री रामलल्लाचे दर्शन घेऊन परतलेल्या दोन हजार रामभक्तांचे मंगळवारी (ता. २०) सायंकाळी खासदार डॉ. भामरे यांच्यातर्फे चाळीसगाव येथील रेल्वेस्थानकात फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले.

धुळे येथील रेल्वेस्थानकात मंगळवारी रात्री नऊला खासदार डॉ. भामरे व भाविकांचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. संपूर्ण प्रवासात रेल्वेसह श्रीराम भक्तांना पोलिस संरक्षण देण्यात आले.

"अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनाची खासदार डॉ. भामरे यांच्यामुळे इच्छा फलद्रूप झाली. प्रवासाची उत्तम व्यवस्था होती. बिसलेरी पाणी, चहा-नाश्ता व दोन वेळचे उत्तम दर्जाचे जेवण मिळाले. भाविकांची खासदारांनी काळजी घेतली. रुपया खर्च आला नाही. आमची ही इच्छापूर्ती केल्याबद्दल खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे शतशः आभार."-मीनाक्षी बोरसे, धुळेे

Devotees' jubilation in train Dr.Subhash Bhamre present at this time.
Dhule News : धुळ्यात 5 दिवस महासंस्कृती महोत्सव : 26 फेब्रुवारीला उद्‍घाटन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com