Ajit Pawar
sakal
धुळे: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७ हजारांवर शेतकरी बाधित झाले. त्यांना मदतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, यंदा खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने सुमारे तीन लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यांच्या मदतीचे काय, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी श्यामकांत सनेर, रामकृष्ण पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदत देत सरकारचे लक्ष वेधले. तसेच हाच धागा पकडत जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदतीचा हात देत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केले.