Dhule Crop Insurance: पिक विम्यातील अटींमुळे शेतकरी धास्तावले! कागदपत्रांवरील नाव- आडनावातील त्रूटी दूर करण्याची सूचना

Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी विमा भरण्यास सुरूवात झाली आहे.
Crop Insurance
Crop Insuranceesakal

Dhule Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी विमा भरण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेच्या अधिकृत पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ रुपया भरावा लागणार आहे. मात्र, विमा भरण्यासाठी यंदा जाचक अटी लादण्यात आल्याने अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जाते. ( Farmers intimidated by terms of crop insurance Notice to remove name surname errors on documents )

पिक विमा भरताना आधारकार्ड, सातबाऱ्यावरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव एकसारखे असल्यावरच पीकविमा भरता येणार आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या आधारकार्ड व सातबाऱ्यावरील नावामध्ये बदल आहेत. ती दुरुस्ती करेपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत संपेल, या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

विम्यासाठी नवीन नियम

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपली पिके संरक्षित करीत आहेत. परंतु, यावर्षी खरीप विमा भरताना नवीन नियम आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक, सातबाऱ्यावरील नाव सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे. तसेच, काहींच्या सातबाऱ्यावर आडनावात फरक आहे. त्यांनी आधार, बँक पासबुकवर आहे तसे आडनाव करून घेणे गरजेचे आहे.

आधारकार्ड, बँक पासबुक व सातबाऱ्यावर स्वतःचे नाव, वडिलांचे नाव किंवा आडनावांमध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे. नंतरच विमा भरता येईल. नाही तर फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. (latest marathi news)

Crop Insurance
Jalgaon Crop Insurance : पीकविमा मिळत नसल्याने जळगावात विमा कंपनीच्या कार्यालयाला ‘शेण’

पंधरा जुलैपर्यंत मुदत

शेतकऱ्यांनी सातबारा व आधारकार्डवरील नावे वेगळे असतील, तर गॅझेट अथवा शपथपत्र देऊन सातबाऱ्यावरील नाव आधारकार्डप्रमाणे करणे गरजेचे आहे. काही ज्येष्ठ व्यक्तींचा अंगठ्याचा ठसा आधारकार्ड तयार करण्यावेळी घेत नाही. त्यामुळे अडचण निर्माण होणार आहे. विमा भरण्याची शेवटची मुदत पंधरा जुलै आहे. अशात नावे दुरुस्तीमध्येच वेळ जाऊन पीक विमा भरता येईल की नाही, अशी चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

योजनेत असा लाभ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्सची नेमणूक करण्यात आली आहे. यातील शासनाच्या पिकानुरुप व देण्यात आलेल्या तारखांनुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. योजनेत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या बाह्य धोक्यांपासून विमा संरक्षण दिले जाते. यामध्ये दुष्काळ, पूर, पावसाने ओढ घेणे, दरड कोसळणे, चक्रीवादळ, वादळे, धुळीची वादळे, पूर परिस्थिती, कीडीचा प्रादुर्भाव होणे, आजार आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे.

नोंदणीसाठी सुविधा

पिकाचे नुकसान समजून घेण्यासाठी राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत समावेश असलेल्या पिकांचे क्रॉप कटिंग एक्सपिरिमेंट्सचे (सीसीईज) नियोजन आणि आयोजन करण्यात येते. जर सीसीईजचे आयोजन केल्यानंतर उत्पादनाची आकडेवारी कमी आढळल्यास शेतकऱ्यांना उत्पादनातील फरक दिला जातो. या विमा योजनेमध्ये पिकांच्या लागवडीसह अनेक टप्प्यांमध्ये काम केले जाते जसे पेरणीपूर्वी, पेरणी आणि कापणी नंतरच्या धोक्यांचा अभ्यास केला जातो.

पीएमएफबीवाय योजनेंतर्गत असेलल्या उत्पादनांना राज्य सरकारच्या कृषी विभागाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेशी किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससीज) अथवा एजंटशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा. शेतकरी फार्मर्स ॲप वर किंवा https://pmfby.gov.in/farmerLogin या वेबसाईटवर नोंदणी करता येऊ शकते.

Crop Insurance
Crop Insurance : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत 15 जुलैपर्यंत सहभागाची संधी

धुळे जिल्हा : प्रधानमंत्री पीक विमा योजना

घोषित पिके.......प्रती हेक्टर विमा रक्कम.........प्रती अर्ज भरायची रक्कम

भात...............४०,०००.........................८००

ज्वारी.............३२,५००..........................६५०

बाजरी.............२७,५००..........................५५०

नाचणी............२०,०००...........................४००

भूईमुग.............३७,५००...........................७५०

सोयाबीन...........५०,०००..........................१०००

तीळ................२५,०००..........................५००

मूग.................२२,५००..........................४५०

उडीद...............२२,५००..........................४५०

तूर..................३६,८०२..........................७३६.०४

कापूस...............५०,०००.........................२५००

मका.................३५,५९८.........................७११.९६

कांदा................ ७०,०००........................३५००

Crop Insurance
Dhule Crop Insurance : लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्या‍ना पीकविम्याचा लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com