Dhule Fraud News : तोतया जीएसटी अधिकाऱ्यांचा पुण्याच्या कंपनीला लाखांचा गंडा

Dhule Fraud : धमकी देऊन एक लाख रुपयांची रक्कम उकळल्याप्रकरणी सांगवी (ता. शिरपूर) येथील पोलिस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
fraud crime
fraud crimeesakal

Dhule Fraud News : जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करून कंपनीची यंत्रसामग्री जप्त करण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची रक्कम उकळल्याप्रकरणी सांगवी (ता. शिरपूर) येथील पोलिस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे येथील बनावट जीएसटी प्रकरणाच्या धर्तीवरच या गुन्ह्यातही फोन पे द्वारे रक्कम वसूल केल्याचे निष्पन्न झाले आहे. ( Fake GST officials duped Pune company of lakhs )

fraud crime
Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दहा ऑक्टोबर २०२३ ला ही घटना घडली होती. ८ मे रोजी इन्फिनिटी सोल्यूशन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दिल्ली येथे ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान पॅकेजिंग साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यात पुणे येथील इन्फिनिटी सोल्यूशन्स कंपनीने सहभाग घेतला होता. प्रदर्शनासाठी कंपनीने आपल्या वाहनातून यंत्रसामग्री नेली होती. प्रदर्शन संपल्यानंतर वाहनचालक सतीश डांगी ट्रक (क्रमांक : एमएच ४६ बीव्ही ०४६२) घेऊन पुणे येथे जाण्यासाठी निघाले.

अडीच लाख द्या

१० ऑक्टोबरला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी महेश नवले यांनी हिशेब व्यवस्थापक रोहित कुळकर्णी यांना कंपनीचा ट्रक धुळे येथे जीएसटी अधिकाऱ्यांनी पकडला आहे, त्यांच्याशी बोलणे करा असे सांगितले. कुळकर्णी व नवले यांनी संबंधित व्यक्तीला फोन केला असता त्याने आपण जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून वाहन चालकाकडे असलेले डिलिव्हरी चलन चुकीचे असून, यंत्रे जप्त करण्याची धमकी दिली.

fraud crime
Dhule Fraud Crime : पीडितेची शारीरिक संबंधातून फसवणूक; आरोपीला 10 वर्षे कारावास

वाहन परत हवे असेल तर तातडीने दोनशे टक्के दंड भरावा लागेल असेही त्याने सांगितले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ऑनलाइन पद्धतीने दुरुस्ती करतो, असे सांगून वाहन सोडण्याची विनंती केली. मात्र, त्याने वेळ नसल्याचे सांगून अडीच लाख रुपये देवून टाका, असा निरोप दिला. तडजोडीअंती त्याने एक लाख ५ हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली.

फसगतीचा संशय

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चालकाशी संपर्क केला असता त्याने शिरपूरजवळ हाडाखेड येथे सीमा तपासणी नाक्याजवळ राजस्थानी ढाब्यावर बॉलेरो वाहन उभे असून, त्यातील चार जणांनी कागदपत्रे आणि ट्रक ताब्यात घेतला आहे, अशी माहिती दिली. या वाहनावर पोलिस लिहिले असल्याचेही त्याने सांगितले. कंपनीचे कार्यकारी संचालक अमित कटारिया यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना प्रकरण हाताळण्याचे निर्देश दिले.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोन पे वरून ठरलेली रक्कम दिली. काही दिवसांपूर्वी धुळे शहरात बनावट जीएसटी अधिकाऱ्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची वार्ता समजल्यानंतर फसगत झाल्याचा कंपनीला संशय आला. त्यानंतर सांगवी पोलिसांना माहिती देऊन फिर्याद दाखल करण्यात आली.

fraud crime
Dhule Fraud Crime News : धुळेतील माजी मंत्र्यांसह चौघांवर शेत मिळकतीबाबत गैरव्यवहाराचा गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com