धुळे- महापालिकेच्या दस्तावेजात बनावट फेरफार करून तब्बल नऊ लाख ४१ हजार ९७५ रुपयांचा आर्थिक लाभ स्वतःसाठी मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी निवृत्त मालमत्ता कर निरीक्षकासह तत्कालीन वेतन लिपिक आणि अधीक्षक, अशा तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.