Dhule Crime News : शिरपूरहून निघालेला गांजाचा प्रवास धुळ्यात थांबवला!
Ganja Trafficking Busted Near Dhule Highway : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मोराणे ब्रिजजवळ सापळा रचून पोलिसांनी २८ किलो गांजा व १५ लाख रुपये किमतीची कार जप्त केली. मध्य प्रदेशातील तरुणाला अटक करण्यात आली. असून तो शिरपूरहून नाशिककडे गांजा घेवून जात होता.
धुळे- शिरपूरहून नाशिककडे कारमधून होणारी गांजा तस्करी धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने रोखली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सहा लाख १६ हजार ४४० रूपये किमतीचा २८ किलो गांजा व १५ लाखांची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.