Dhule News : सोने-चांदी महागल्याने बजेट विस्कळित; लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांवर संकट

Dhule News : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईची झळ आता लग्नसराईला बसू लागली आहे.
Gold Silver
Gold Silver esakal

Dhule News : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईची झळ आता लग्नसराईला बसू लागली आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने लग्नसमारंभ असलेल्या कुटुंबांवर आर्थिक बोजा वाढला आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट विस्कळित झाले आहे. त्यामुळे ग्राहकांचे पुन्हा टेन्शन वाढल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. (Dhule gold and silver become expensive budget was disrupted)

अनेक दिवसांपासून फारसा चढ-उतार नसलेल्या सोन्याच्या दरात मार्चच्या सुरवातीपासून वाढ सुरू झाली. १० फेब्रुवारीला ६२ हजार ९०० रुपये असलेले सोने महिनाभरात तीन हजार शंभर रुपयांनी वधारले. स्थानिक सराफा बाजारात सध्या सोने (२४ कॅरेट) प्रतिदहा ग्रॅम ६६ हजार (जीएसटी अतिरिक्त), (२२ कॅरेट) ६० हजार ५२०, तर चांदी प्रतिकिलो ७३ हजारांवर पोचली आहे.

गुंतवणुकीस प्राधान्य

लग्नसराईच्या काळात दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. स्थानिक बाजारात सोन्यातील दरवाढ कायम आहे. मागील सहा दिवसांत दोन हजार २५० रुपयांनी वाढ झाली. मंगळवारी (ता. १२) सोन्याचे दर प्रतिदहा ग्रॅम ६६ हजार रुपये (जीएसटी अतिरिक्त) होते. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी मेमध्ये सोने ६२ हजारांच्या पार गेले होते. पुन्हा एकदा लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. चांदी प्रतिकिलो ७३ हजारांपर्यंत पोचली आहे. याचा परिणाम लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या कुटुंबांवर दिसून येत आहे. महागाईची छाया लग्नसराईवर दिसत आहे. लग्नसराईचा हंगाम पाहता येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

Gold Silver
Dhule News : मोदींच्या नेतृत्वात विकसित भारत घडविण्यासाठी सज्ज व्हा : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड

स्थानिक सोने-चांदी भाव (जीएसटी अतिरिक्त)

तारीख........सोने......सोने......चांदी

(२४ कॅरेट)... (२२ कॅरेट)... (प्रतिकिलो)

* १२ मार्च... ६६,०००... ६०,५२०... ७३,०००

* ११ मार्च... ६६,०००... ६०,५२०... ७३,०००

* १० मार्च... ६६,०००... ६०,५२०... ७३,०००

* ९ मार्च... ६६,०००... ६०,५२०... ७३,०००

* ८ मार्च... ६६,५००... ६०,०००... ७३,५००

* ७ मार्च... ६५,३००... ५९,८८०... ७३,०००

* ६ मार्च... ६४,८५०... ५९,४६०... ७२,४००

* ५ मार्च... ६४,८५०... ५९,४५०... ७२,६००

* ४ मार्च... ६४,०००... ५८,६६०... ७१,४००

दर आणखी वाढणार

लग्नसराई आणि जागतिक स्तरावर अस्थिरता आलेली असल्याने सोन्या-चांदीची मागणी वाढली आहे. तसेच लग्नसराईत सर्वाधिक सोन्याची खरेदी होत असतानाच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे. लवकरच सोने ७० हजारांच्या जवळपास जाईल, असे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Gold Silver
Dhule Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : दोंडाईचात राहुल गांधी यांचा रोड शो; तरुणांकडून हस्तांदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com