Dhule Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : दोंडाईचात राहुल गांधी यांचा रोड शो; तरुणांकडून हस्तांदोलन

Dhule Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : मुक्कामातून देशाचे लक्ष वेधणारे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेंतर्गत बुधवारी (ता. १३) सकाळी नऊला जल्लोषात रोड शो झाला.
MP Rahul Gandhi participating in the road show. Citizens present for the reception in the second photo.
MP Rahul Gandhi participating in the road show. Citizens present for the reception in the second photo.esakal

Rahul Gandhi In Dhule : येथील मुक्कामातून देशाचे लक्ष वेधणारे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेंतर्गत बुधवारी (ता. १३) सकाळी नऊला जल्लोषात रोड शो झाला. पोलिस बंदोबस्तात शेकडो काँग्रेस समर्थकांनी यात्रेत सहभाग नोंदविला. ढोलताशा पथक, आदिवासी समूहनृत्याने रोड शोची शोभा वाढविली.

खासदार गांधी यांच्यासह भारत जोडो यात्रेचे मंगळवारी सायंकाळी दोंडाईचात आगमन झाले. मुक्कामानंतर बुधवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सकाळी नऊला जीपद्वारे रोड शो सुरू झाला. (Dhule Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi road show in Dondaicha)

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर, माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, जुई देशमुख- पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल माणिक, वसंत कोळी, दरबासिंग गिरासे, कुलदीप निकम आदी उपस्थित होते.

रोड शोमध्ये असंख्य तरुणांनी खासदार गांधी यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘राहुलजी... आगे बढो...’ अशा घोषणाबाजीतून वातावरणात चैतन्य निर्माण केले. विविध मार्गे रोड शोनंतर भारत जोडो न्याययात्रा धुळे शहराकडे रवाना झाली.

वीस मिनिटांत खासदार गांधी यांनी शहरवासीयांना हात उंचावून अभिवादन केले. रोड शो मार्गावरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. काही मार्गांची वाहतूक वळविण्यात आली होती. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी सुमारे सहाशे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता.

सोनगीर येथे राहुल गांधींना पाहण्यासाठी गर्दी

सोनगीर ः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पाहण्यासाठी, हस्तांदोलनासाठी सोनगीर फाट्यावर एकच गर्दी झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत झाले. मात्र ते आपल्या ओपन जीपमधून खाली न उतरता त्यांनी हात हलवून उपस्थितांना प्रतिसाद देत अभिवादनाचा स्वीकार केला. शेकडोंच्या गर्दीतही काहींनी हस्तांदोलन करण्यात यश मिळविले. (latest marathi news)

सोनगीर येथे राहुल गांधी यांना पाहण्यासाठी झालेली गर्दी.
सोनगीर येथे राहुल गांधी यांना पाहण्यासाठी झालेली गर्दी.esakal
MP Rahul Gandhi participating in the road show. Citizens present for the reception in the second photo.
Rahul Gandhi in Dhule: माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंचं नाव घेत राहुल गांधींचे मोदी सरकारवर गंभीर आरोप

भारत जोडो न्याययात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी दोंडाईचाहून धुळ्याकडे जात असताना येथील फाट्यावर सकाळी दहाच्या सुमारास पोचले. राहुल गांधी यांच्यासमवेत जीपवर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्यामकांत सनेर होते. या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, सरपंच रंजना मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामलाल मोरे,

उपसरपंच लखन ठेलारी, प्रकाश गुजर, नंदू धनगर, रवींद्र माळी, आरिफ खाँ पठाण, शफउद्दीन पठाण, केदारेश्वर मोरे, उत्तम महाजन, मुन्ना पठाण, प्रमोद धनगर, इरफान कुरेशी, किशोर पावनकर, सुनील बागूल, हरिश्चंद्र पाटील, संदीप गुजर, सुनील माळी, मोहन सैंदाने, संजय पाटील, हसन खाँ पठाण, वसंत पाटील, प्रभाकर गुजर, मणिलाल पाटील, विशाल कासार, राहुल देशमुख, पिंटू भिल, माजी सैनिक विनोद पाटील आदी उपस्थित होते.

क्षणचित्रे

-राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी. आसपासच्या गावांतून कार्यकर्ते

मिळेल त्या वाहनाने उपस्थित.

-ढोलताशांच्या गजरात स्वागताची तयारी.

-सोनगीर फाट्यावर भव्य कटआउट, अनेक बॅनर व काँग्रेसचे झेंडे.

-'जातीय जनगणनेला आपला पाठिंबा आहे का, मिस्ड कॉल द्या’ असे छापलेल्या पोस्टर्सचे तसेच काँग्रेसच्या फ्रेंडशिप बॅंडचे वाटप.

-गर्दीच्या अभिवादनाला राहुल गांधींचा स्मितहास्याने प्रतिसाद.

-कडेकोट सुरक्षाव्यवस्था. सोनगीर, नरडाणा पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व पोलिस कर्मचारी सहभागी. वाहतूक शाखेचे पोलिसही हजर.

-महामार्गावर वाहतूक थांबविण्यात आल्याने वाहनांचा रांगा.

MP Rahul Gandhi participating in the road show. Citizens present for the reception in the second photo.
Nashik Rahul Gandhi Road Show: देशातील मुळ समस्यांचे उच्चाटन करुन सामान्यांना न्याय देवू : राहुल गांधी

विखरणची तयारी

विखरण ः ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी खासदार राहुल गांधी यांच्या स्वागताची विखरण (ता. शिंदखेडा) येथे बुधवारी (ता. १३) सकाळी तयारी केली. यात खासदार गांधी विखरण येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या वारसांची भेट घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव खासदार गांधी थांबले नाहीत.

असे सांगण्यात आल्याने उपस्थित शेतकरी, ग्रामस्थांच्या अपेक्षेवर विरजण पडले. त्यांनी खासदार गांधी यांच्या स्वागतासाठी मंडपही टाकला होता. खासदार गांधी यांनी जीपमध्ये बसूनच हात उंचावून अभिवादन केले. आमदार कुणाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर उपस्थित होते.

ढोलताशांच्या गजरात देवभाने फाट्यावर स्वागत

कापडणे : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेचे देवभाने-कापडणे फाट्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार कुणाल पाटील यांचेही उत्साहात स्वागत झाले. कार्यकर्त्यांनी वाजंत्रीच्या गजरात घोषणा दिल्या. माजी सरपंच भटू पाटील, प्रमोद पाटील, माजी सरपंच कीर्तिमंत कौठळकर, विजय बोरसे, बिल्लू पाटील आदींनी स्वागत केले.

MP Rahul Gandhi participating in the road show. Citizens present for the reception in the second photo.
Dhule Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची ‘गॅरंटी’ मोदींकडून ‘कॉपी’ : जयराम रमेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com