Farmer Scheme
sakal
धुळे: शेतीकाम करताना होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेली ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना’ पूर्णपणे ऑनलाइन झाली आहे. राज्य शासनाने ही संपूर्ण प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर समाविष्ट केल्यामुळे अर्ज केल्यापासून ते अनुदान मिळेपर्यंतचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. आता मंजूर झालेले अनुदान कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, ज्यामुळे शेतकरी कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळणार आहे.