Dhule Zilla Parishad
sakal
धुळे: पावसाळा आणि त्यानंतर जलजन्य आजारांचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या जलस्रोत तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील ५३८ ग्रामपंचायतींचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा मिळाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांच्या मार्गदर्शनात राबविलेल्या या विशेष मोहिमेत या ५३८ ग्रामपंचायतींना ‘सौम्य जोखीम’ दर्शविणारे ग्रीन कार्ड प्रदान करण्यात आले आहे.